दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा चुलबंद नदीत आढळला मृतदेह...

Apr 20, 2026 - 12:21
 0
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा चुलबंद नदीत आढळला मृतदेह...

 नितीन वरगंटीवार, भंडारा

लाखांदूर शहरालगत वाहणाऱ्या चुलबंद नदीच्या पात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रविवारी १९ एप्रिल रोजी दुपारी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख पटली असून, तो दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला युवक विकास प्रभाकर ठाकरे (वय ३५ वर्षे) असल्याचे निष्पन्न झाले आहे.
​प्राप्त माहितीनुसार, विकास ठाकरे हा मूळचा सरांडी (बु.) येथील रहिवासी असून सध्या तो नाग परसोडी येथे वास्तव्यास होता. गेल्या दोन दिवसांपासून तो घरातून बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने अखेर लाखांदूर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
​रविवारी दुपारी चुलबंद नदी पात्रातील भगवान शंकर मंदिरासमोरील पाण्यात एक मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच नदीकाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
​घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. विकासच्या मृत्यूमुळे त्याच्या मूळ गावी आणि नाग परसोडी परिसरात शोककळा पसरली आहे. हा घातपात आहे की अपघात, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी