Rain Update || चाकणमध्ये मुसळधार पावसाचा फटका; नगराध्यक्षा व नगरसेवकांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी व नागरिकांना धीर...!

Jul 7, 2026 - 10:33
 0
Rain Update || चाकणमध्ये मुसळधार पावसाचा फटका; नगराध्यक्षा व नगरसेवकांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी व नागरिकांना धीर...!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चाकण शहर आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागांत आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे, नगरसेवक नितीन गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आकाश जाधव आणि विविध प्रभागांतील नगरसेवक व नगरसेविकांनी तात्काळ पूरग्रस्त भागाची पाहणी केली.


नुकसानग्रस्त नागरिकांना दिला आधार..

पाहणी दरम्यान, अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांवर पाणी साचल्याचे आणि काही ठिकाणी पाणी थेट नागरिकांच्या घरांत शिरल्याचे निदर्शनास आले. या संकटकाळात लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानग्रस्त नागरिकांची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या वतीने पाणी साचलेल्या भागातून पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि तुंबलेली गटारे तत्काळ साफ करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले.


युद्धपातळीवर मदतकार्य आणि उपाययोजना...

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नगराध्यक्षा मनीषा गोरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी साचलेल्या ठिकाणांहून तात्काळ पाण्याचा निचरा करण्याचे आणि तुंबलेली गटारे त्वरित साफ करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी योग्य नियोजनाची ग्वाहीही त्यांनी दिली आहे. स्थानिक नागरिकांनीही पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे केवळ कागदावरच झाली का? असा सवाल उपस्थित केला असून, नैसर्गिक ओढे व नाल्यांमधील अडथळे दूर करून सक्षम जलनिस्सारण यंत्रणा उभी करण्याची मागणी केली आहे.


या परिस्थितीत नगरसेवक नितीन गोरे यांचे नागरिकांना आवाहन

सध्या पाऊस अजूनही सुरू असल्याने परिस्थिती गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर, नगरसेवक नितीन गोरे यांनी सर्व चाकणकरांना सतर्क राहण्याचे आणि स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नगरपरिषद प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली असून, पूरग्रस्त भागांत कर्मचारी व यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी