Tiger Death Update || कडूसमध्ये बिबट्याचा संशयास्पद मृत्यू; अरगडे शिवारात आढळला मृतदेह...!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खेड (प्रतिनिधी): खेड तालुक्यातील कडूस गावातील अरगडे शिवारात आज शुक्रवारी सकाळी एक बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अरगडे शिवारातील शेतात काही नागरिकांना हा बिबट्या निपचित पडलेला दिसला. जवळ जाऊन पाहिल्यावर तो मृत असल्याचे समजले. ग्रामस्थांनी तातडीने याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
मृत्यूचे कारण अस्पष्ट..
बिबट्याच्या शरीरावर बाह्य जखमांच्या खुणा दिसत नसल्याने त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की अन्य काही कारणाने, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनानंतरच (Post-mortem) मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
खेड वनविभाग सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, नागरिकांनी घाबरून न जाता वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0