मोठी बातमी : खेड बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना अनुभवानुसार पदोन्नती भेटणार..!

सेवक समितीच्या बैठकीत महत्त्वाचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेतल्याने समाधान..

Oct 7, 2026 - 17:57
Oct 7, 2026 - 18:01
 0
मोठी बातमी : खेड बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना अनुभवानुसार पदोन्नती भेटणार..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

राजगुरूनगर(ता. खेड) : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या अनुभवानुसार व सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी (दि. ६) बाजार समितीच्या कार्यालयात पार पडलेल्या सेवक समितीच्या बैठकीत हे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. या बैठकीचे अध्यक्षस्थान सेवक समितीच्या अध्यक्षा, संचालिका तथा माजी उपसभापती क्रांतीताई सोमवंशी यांनी भूषवले.

बाजार समितीत वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाची प्रत्यक्ष दखल या निर्णयाद्वारे घेण्यात आल्यामुळे संपूर्ण सेवक वर्गात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे.

​या बैठकीस बाजार समितीचे सभापती अशोक राक्षे, उपसभापती रणजित गाडे, माजी सभापती विजयसिंह शिंदे, संचालक जयसिंग भोगाडे, कैलास लिंभोरे, अनुराग जैद, सोमनाथ मुंगसे, विठ्ठल वनघरे, कमलताई कड, सागर मुऱ्हे, माणिक गोरे, सयाजी मोहिते, महेंद्र गोरे, सुधीर भोमाळे तसेच सचिव बाळासाहेब धंद्रे आणि बाजार समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी