गांधी विद्यालय, पहेला येथे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व सामाजिक जनजागृतीचे मार्गदर्शन..

Jul 30, 2026 - 13:33
Jul 30, 2026 - 14:10
 0
गांधी विद्यालय, पहेला येथे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व सामाजिक जनजागृतीचे मार्गदर्शन..

प्रतिनिधी भंडारा -- नितीन वरगंटीवार, भंडारा

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त गांधी विद्यालय, पहेला येथे अड्याळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन तायवाडे यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, हॅकिंग, वैयक्तिक माहितीची चोरी, नशामुक्ती तसेच मुलींची सुरक्षा या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.


यावेळी त्यांनी संगणकीय (कॉम्प्युटर) प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर कसा करावा आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत माहिती दिली. तसेच नशामुक्त समाजाची गरज आणि मुलींच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने जागरूक राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ठाणेदार सचिन तायवाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला गांधी विद्यालय, पहेला येथील मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अड्याळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन तायवाडे यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींना अत्यंत उपयुक्त व अमूल्य माहिती मिळाली असून, अशा जनजागृतीपर कार्यक्रमांची आजच्या काळात नितांत आवश्यकता आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी