मोठी बातमी : खेड तालुक्यावर शोककळा: कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू...!

Mar 29, 2026 - 09:56
 0
मोठी बातमी : खेड तालुक्यावर शोककळा: कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू...!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

खेड (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका तरुण पोलीस कॉन्स्टेबलचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शशिकांत श्रीधर होले (वय ३५, रा. होलेवाडी, ता. खेड) असे या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण खेड तालुक्यासह पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय?...

​मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ मार्च २०२६ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शशिकांत होले हे आपल्या कर्तव्यावरून बुलेटने (MH-14-GG-7171) खेड ते पाबळ रोडने आपल्या गावाकडे (होलेवाडी) जात होते. त्यांच्या पाठीमागून त्यांचे चुलत भाऊ विजय भानुदास होले हे देखील दुचाकीवरून येत होते.

​टाकळकरवाडी फाट्याजवळ आले असता, समोरून येणाऱ्या एका रिक्षाने (MH-12-F-6847) अचानक ‘यू-टर्न’ घेतला. या अनपेक्षित वळणामुळे शशिकांत यांच्या बुलेटची रिक्षाला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, शशिकांत रस्त्यावर फेकले गेले. हेल्मेट डोक्यातून निघून गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि ते जागीच बेशुद्ध पडले.

उपचारापूर्वीच मृत्यू...

​अपघातानंतर विजय होले यांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून राजगुरूनगर येथील सांडभोर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. दुर्दैवाने, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रात्री ११:१२ च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना तपासून 'मृत' घोषित केले.

रिक्षा चालकाविरुद्ध तक्रार...

​रिक्षा चालकाच्या हलगर्जीपणामुळे आणि चुकीच्या पद्धतीने वळण घेतल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याप्रकरणी विजय होले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षा चालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

​शशिकांत होले हे अत्यंत मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने होलेवाडी ग्रामस्थांवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 2
Funny Funny 0
Angry Angry 1
Sad Sad 7
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी