अपघात : लेन ओलांडली अन होत्याचे नव्हते झाले! मंचरमध्ये कार-बसचा भीषण अपघात; पती-पत्नीसह आईचा जागीच मृत्यू..!

Mar 23, 2026 - 09:26
 0
अपघात : लेन ओलांडली अन होत्याचे नव्हते झाले! मंचरमध्ये कार-बसचा भीषण अपघात; पती-पत्नीसह आईचा जागीच मृत्यू..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

मंचर (आंबेगाव): पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर येथे आज एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. नाशिकहून पुण्याकडे येत असताना एका खाजगी ट्रॅव्हल्स बस आणि कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन आंबेगावे हे आपल्या कुटुंबासह नाशिक येथील एक कार्यक्रम आटोपून पिंपरी येथील आपल्या घराकडे कारने परतत होते. मंचर परिसरात आल्यावर चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कारने दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध दिशेने (पुण्याकडून नाशिककडे) जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आणि ती बसच्या खाली घुसली.


या भीषण अपघातात मल्लिकार्जुन आंबेगावे, त्यांच्या पत्नी आरती आंबेगावे आणि आई लता तुपलोंढे यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने, या अपघातात एक मुलगा आणि एक मुलगी बचावले आहेत, मात्र त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


परिसरात हळहळ..

नाशिकचा कार्यक्रम आनंदाने आटोपून घराकडे परतणाऱ्या या कुटुंबावर काळाने अशा प्रकारे घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी धाव घेऊन बचावकार्य राबवले आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 4
Wow Wow 1
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी