‘गुड टच-बॅड टच’पासून 112 पर्यंत.! अड्याळच्या विद्यार्थ्यांना दामिनी पथकाचे मार्गदर्शन...

Sep 29, 2026 - 16:18
 0
‘गुड टच-बॅड टच’पासून 112 पर्यंत.! अड्याळच्या विद्यार्थ्यांना दामिनी पथकाचे मार्गदर्शन...

प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार, भंडारा

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथील जिल्हा परिषद उत्तर बुनियादी शाळेत विद्यार्थ्यांना दामिनी पथकाकडून सुरक्षिततेचे धडे देण्यात आले.

२९ सप्टेंबर रोजी दामिनी पथक भंडारा आणि त्यांच्या टीमने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ‘गुड टच-बॅड टच’, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 112 क्रमांक आणि मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.

अनोळखी व्यक्तींपासून सावध राहणे, चुकीचा स्पर्श झाल्यास विश्वासू व्यक्तीला सांगणे आणि अडचणीच्या प्रसंगी तात्काळ मदत मागणे, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

तसंच, मोबाईलचा अतिरेक टाळून त्याचा योग्य आणि सुरक्षित वापर करण्याचा संदेशही देण्यात आला.

लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.


What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी