Political Activity || राजेश म्हस्के साबळेवाडीचे नवे उपसरपंच; ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडीची मोहोर..!

Nov 8, 2026 - 18:14
 0
Political Activity || राजेश म्हस्के साबळेवाडीचे नवे उपसरपंच; ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडीची मोहोर..!

लोकन्याय मराठी विशेष प्रतिनिधी 

शेलपिंपळगाव(ता. खेड) : साबळेवाडी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेश ज्ञानेश्वर म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच गणेश काटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष बैठकीत ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. उपसरपंच पदासाठी राजेश म्हस्के यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती माळी यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अभिजित साबळे, आण्णासाहेब साबळे, वर्षा साबळे, सुनीता साबळे, सोनाली साबळे, रेखा साबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते सत्कार...

नवनिर्वाचित उपसरपंच राजेश म्हस्के यांचा पंचायत समिती सदस्या विद्या सयाजीराजे मोहिते, पै. रामभाऊ सासवडे, पै. चेतन दरेकर, मयूर मोहिते, पै. अनिल साबळे, दौलत मोरे, तुकाराम काटकर, रायबा साबळे, संतोष शेटे, पवनराजे जाचक, गणेश शिंदे, महेश जगताप, गोरख सातव, अतुल वागस्कर, उषा ताई उनवणे आदी मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

​"मिळालेल्या पदाच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न करू."

— राजेश म्हस्के (उपसरपंच, साबळेवाडी)

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी