Assault on the Driver ||  'शिवनेरी'चा मार्ग अडवणाऱ्या गुंडांना चाकण पोलिसांचा 'कायदेशीर ब्रेक'; ऑन-ड्युटी चालकाला मारहाण करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या!

Nov 12, 2026 - 19:04
Nov 12, 2026 - 19:05
 0
Assault on the Driver ||  'शिवनेरी'चा मार्ग अडवणाऱ्या गुंडांना चाकण पोलिसांचा 'कायदेशीर ब्रेक'; ऑन-ड्युटी चालकाला मारहाण करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण (पुणे): शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या एसटी महामंडळाच्या 'शिवनेरी' बस चालकाचा रस्ता अडवून शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना चाकण दक्षिण पोलिसांनी तात्काळ अटक करून गजाआड केले आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती.

नेमकी घटना काय?

म.रा.म.वि. महामंडळाच्या नाशिक आगारातील चालक प्रज्ञानंद पांडुरंग गवई (वय ४३, रा. नाशिक) हे १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास 'शिवनेरी' बस (क्र. MH 06 ES 1364) घेऊन स्वारगेटवरून नाशिककडे जात होते. चाकण येथील मुटकेवाडी सिग्नल चौकात दोघा आरोपींनी आपली मोटरसायकल अचानक बससमोर आडवी लावून रस्ता रोखला. त्यानंतर बसच्या दरवाजातून आत शिरून आरोपींनी चालक गवई यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणला. 

गुन्हा दाखल आणि तात्काळ अटक..

या प्रकरणी ११ नोव्हेंबर २०२६ रोजी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १३२, १२६(२), १२१(१), २२१ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत करण मास्ती गायकवाड (वय २३) आणि कार्तिक मास्ती गायकवाड (वय २०, दोघे रा. गायकवाड वस्ती, कुरूळी, ता. खेड, जि. पुणे) या दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली.

आरोपींना कठोर शासन व्हावे; नागरिकांची तीव्र मागणी..

प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडणाऱ्या आणि ऑन-ड्युटी शासकीय कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे हात उगारणाऱ्या समाजकंटकांची मुजोरी मोडून काढण्यासाठी आरोपींना कठोर शासन व्हायला हवे, जेणेकरून भविष्यात कोणीही कायदा हातात घेण्याचे धाडस करणार नाही, अशी तीव्र मागणी प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शासकीय कर्मचारी किंवा नागरिकांवर हल्ला करणाऱ्यांवर असाच कठोर कायदेशीर बडगा उगारला जाईल, असा सक्त इशारा चाकण दक्षिण पोलिसांनी दिला आहे. पोलिसांच्या या तत्पर कारवाईबद्दल जनमानसातून समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले जात आहेत. 

​या पथकाने केली कारवाई..

सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली आणि चाकण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त योगेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोते तसेच पोलीस अंमलदार राहुल मिसाळ, ख्वाजा शेख, विशाल बंड आणि प्रियंका गिरी यांनी मोलाची भूमिका बजावली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी