Crime Update || ‘घरफोडी’चा हायव्होल्टेज बनाव! पतीने दागिने विकू नयेत म्हणून पत्नीनेच रचला कट; तब्बल १४ लाखांच्या दागिन्यांचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा -३ कडून १२ तासांत पर्दाफाश!

Sep 28, 2026 - 08:37
 0
Crime Update || ‘घरफोडी’चा हायव्होल्टेज बनाव! पतीने दागिने विकू नयेत म्हणून पत्नीनेच रचला कट; तब्बल १४ लाखांच्या दागिन्यांचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा -३ कडून १२ तासांत पर्दाफाश!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

दिघी: घरातून तब्बल १३ लाख ९८ हजार ९७८ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने या कथित घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. मात्र, या तपासात उघडकीस आलेल्या सत्याने पोलिसांनाही चकित केले आहे. पतीने सोन्या-चांदीचे दागिने विकून नवीन घर खरेदी करू नये, या भीतीने खुद्द फिर्यादीच्या पत्नीनेच हे सर्व दागिने घरात गुप्त ठिकाणी लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे.

नेमकी घटना काय?

​दिघी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१ (३) आणि ३०५ (अ) अन्वये गु.र.नं. ६२१/२०२६ नुसार घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट ३ कडून समांतर तपास सुरू करण्यात आला. 


तपासादरम्यान पोलीस पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले व संशयित मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. परंतु, इमारतीत बाहेरील कोणाचाही वावर नसल्याचे स्पष्ट झाले तसेच शेजाऱ्यांकडे विचारपूस करूनही कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे संशय बळावल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे व पोलीस हवालदार युवराज बिराजदार यांनी फिर्यादीच्या पत्नीला विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली. गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अचूक अंदाज घेत केलेल्या चौकशीत फिर्यादीच्या पत्नीने अखेर सत्य कबूल केले. पतीने दागिने विकून घर घेऊ नये म्हणून तिनेच ते घरात लपवून ठेवल्याचे सांगितले व पंचांसमक्ष सर्व दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी एकूण १३,९८,९७८ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत.

कारवाई करणारे पोलीस अधिकारी व पथक:

​सदरची धडक कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस हवालदार युवराज बिराजदार (ब.नं. १४१३), पोलीस अंमलदार शशिकांत नांगरे, पोलीस अंमलदार दिलीप राठोड, पोलीस अंमलदार नितीन गुंजाळ, पोलीस अंमलदार निखील फापाळे आणि पोलीस अंमलदार स्वप्निल महाले यांच्या पथकाने एकत्रितपणे केली आहे.  

​या गुन्ह्याचा पुढील तपास दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वरे करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी