Suicide Case || चाकण-तळेगाव रस्त्यावर थरार: दुधाच्या टँकरला लटकलेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह; आत्महत्या की घातपात? पोलिसांकडून तपास सुरू..!

Nov 7, 2026 - 07:22
Nov 7, 2026 - 07:31
 0
Suicide Case || चाकण-तळेगाव रस्त्यावर थरार: दुधाच्या टँकरला लटकलेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह; आत्महत्या की घातपात? पोलिसांकडून तपास सुरू..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : चाकण-तळेगाव मार्गावरील खराबवाडी हद्दीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुधाच्या टँकरला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना आत्महत्या आहे की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात असून पोलीस कसून तपास करत आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, चाकण-तळेगाव रस्त्यावरील नाफेडच्या मोकळ्या जागे समोर दुधाचा टँकर (क्रमांक: एम. एच. १४ डी. एम. ५४५८) रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान, रात्रीच्या सुमारास एका अनोळखी तरुणाने या टँकरच्या वर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी शिडीला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे उघडकीस आले. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरात एकच गर्दी झाली.

​या घटनेची माहिती तातडीने महाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, की यामागे काही घातपाताचा प्रकार आहे, या दोन्ही शक्यतांची पडताळणी करत महाळुंगे पोलीस पुढील तपास करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 2
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 1
Wow Wow 2
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी