Crime Update || हॉर्न वाजवला म्हणून डंपर चालकाच्या डोक्यात घातली टॉमी; चाकण पोलिसांनी बिदर व लातूरमधून अवघ्या १२ तासांत आवळल्या मुसक्या.!

'गुन्हेगारांनो, गाशा गुंडाळा किंवा सरळ व्हा!'; चाकण दक्षिण पोलिसांचा गुन्हेगारी जगताला सज्जड दम..

Sep 17, 2026 - 21:52
 0
Crime Update || हॉर्न वाजवला म्हणून डंपर चालकाच्या डोक्यात घातली टॉमी; चाकण पोलिसांनी बिदर व लातूरमधून अवघ्या १२ तासांत आवळल्या मुसक्या.!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : उद्योगनगरी आणि वाहतुकीचे प्रमुख केंद्र असलेल्या चाकण परिसरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना चाकण दक्षिण पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. किरकोळ कारणावरून एका डंपर चालकाच्या डोक्यात लोखंडी टॉमीने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या दोन सराईत गुंडांच्या मुसक्या चाकण दक्षिण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने (DB) अवघ्या १२ तासांच्या आत आवळल्या आहेत. कर्नाटकच्या बिदर तसेच लातूर येथून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकून पोलिसांनी गुन्हेगारांना कडक संदेश दिला आहे.

​नेमकी घटना काय घडली?

​मिळालेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास डंपर चालक महादेव शंकर सोळंके (वय ३६) हे आपले वाहन घेऊन नाणेकरवाडी येथील स्क्रॅप गोदामाजवळून जात होते. रस्त्यात डंपरचा हॉर्न वाजवल्याचा राग मनात धरून आरोपी हरिदास रामकिशन कलबोले (वय १८ वर्षे २ महिने) आणि लखन तातेराव आवले (वय २३) यांनी चालक महादेव सोळंके यांना अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी सोळंके यांच्या डोक्यात लोखंडी टॉमीने जोरदार प्रहार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पाडले व तेथून पळ काढला.

​या प्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ (१), १२६(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

३० सीसीटीव्ही आणि टॉवर लोकेशन; १२ तासांत थरारक पाठलाग!

​घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चाकण दक्षिण पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनेनंतर दोन्ही आरोपी पसार झाले होते. गुन्हे प्रकटीकरण शाखेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अवघ्या काही तासांत घटनास्थळ परिसरातील सुमारे २५ ते ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे आरोपी कर्नाटकच्या दिशेने पळाल्याचे समोर आले.

यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने क्षणाचाही विलंब न लावता तातडीने पाठलाग सुरू केला. या थरारक मोहिमेत पोलिसांनी मुख्य आरोपी हरिदास कलबोले याला थेट कर्नाटक राज्यातील बिदर येथून आणि दुसरा आरोपी लखन आवले याला लातूर येथून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. गुन्हा घडल्यापासून अवघ्या १२ तासांत परराज्यात जाऊन आरोपींना जेरबंद केल्याने पोलिसांच्या या धडक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गुन्हेगारांना पोलिसांचा सज्जड इशारा...

​चाकण परिसरामध्ये दादागिरी, भाईगिरी किंवा गुन्हेगारी कृत्य खपवून घेतले जाणार नाही; गुन्हा करून पळून जाल तर पाताळातूनही शोधून काढू, असा सज्जड दम पोलिसांनी गुन्हेगारांना दिला आहे.

तपास पथक व कामगिरी:

​या कारवाईत चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोते यांच्यासह पोलीस अंमलदार शिवाजी चव्हाण, सुनील भागवत, रेवन्नाथ खेडकर, राहुल मिसाळ, गजानन चव्हाण, आदम शेख, प्रियंका गिरी व विशाल बंड यांनी मोलाची भूमिका बजावली.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी