Accident Story || ऐन दिवाळीत ठेकेदाराच्या हलगर्जीपणाने विझवला घराचा दिवा! २२ वर्षीय रवी दानवेचा बळी;घटना नक्की काय याचा उल्लेख नाही!ठेकेदाराला वाचवतय कोण?

Nov 7, 2026 - 11:05
 0
Accident Story || ऐन दिवाळीत ठेकेदाराच्या हलगर्जीपणाने विझवला घराचा दिवा! २२ वर्षीय रवी दानवेचा बळी;घटना नक्की काय याचा उल्लेख नाही!ठेकेदाराला वाचवतय कोण?

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

वासुली (ता. खेड) : सगळीकडे दीपोत्सवाचा उत्साह आणि घराघरांत आनंदाचे वातावरण असतानाच चाकण-महाळुंगे औद्योगिक पट्ट्यात एका गरीब, होतकरू तरुणाच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.एका ठेकेदाराच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे आणि शून्य सुरक्षा व्यवस्थेमुळे अवघ्या २२ वर्षांच्या रवी काकासाहेब दानवे या निष्पाप कामगाराला आपला जीव गमवावा लागला. मात्र, ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एका तरुणाचा बळी गेल्यानंतरही स्वतःची कातडी वाचवण्यासाठी ठेकेदाराकडून घटनेत बदल आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा संशयास्पद प्रकार समोर आल्याने परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. 

घटना नक्की कुठे ?कंपनीच्या आत की 'बाहेर' -

​स्थानिक नागरिकांमध्ये आणि कामगारांमध्ये अशी जोरदार चर्चा आहे की, मयत रवी दानवे हा एका कंपनीच्या आवारातील विजेच्या खांबावर चढून काम करत होता. परंतु, उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांत नोंद करण्यात आलेल्या अकस्मात मयत खबरीमध्ये हे काम 'कंपनीजवळ' सुरू होते, असा बनाव रचण्यात आल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्ष काम कंपनीच्या आत सुरू असताना ते बाहेर दाखवून आणि वस्तुस्थिती लपवून ठेकेदाराला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला जात आहे का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

​'घसरून पडला' की 'चक्कर आली'? ठेकेदाराच्या विधानात प्रचंड विसंगती!

​या संपूर्ण प्रकरणात ठेकेदाराची विधाने आणि पोलिसांकडे नोंदवलेली माहिती यात मोठी तफावत उघडकीस आली आहे.

• एकीकडे ठेकेदार हा तरुण विजेच्या पोलवरून घसरून पडल्याचे सांगत आहे.

• ​तर दुसरीकडे, पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीत 'त्याला चक्कर आली आणि तो पोलवरून खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली', अशी नोंद करण्यात आली आहे. 

•  विजेच्या खांबावर मयत तरुण कामासाठी चढला होता मग त्या ठेकेदाराचा उल्लेख पोलीस ठाण्यातील नोंदीत का घेतला नाही?

एकाच घटनेबाबत वेगवेगळी कारणे का दिली जात आहेत? मयत तरुणाचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, याबाबत संशयाचे दाट धुके निर्माण झाले असून ठेकेदार खरी माहिती दडपून चौकशीची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे की पोलीस ठेकेदाराला पाठिशी घालत आहेत? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

विना सुरक्षा साधने मृत्यूच्या खाईत ढकलले; हजर असणारा सुपरवायझर डोळे झाकून बसला होता का?

​विजेच्या खांबावर चढून काम करताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, इन्सुलेटेड शूज यांसारखी आवश्यक जीवितरक्षक साधने पुरवणे ही ठेकेदाराची कायदेशीर व नैतिक जबाबदारी असते. मात्र, स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी दानवे याच्याकडे पोलवर चढताना कोणतीही सुरक्षा उपकरणे नव्हती.

विशेष म्हणजे, घटनास्थळी आपला सुपरवायझर उपस्थित होता, अशी कबुली खुद्द ठेकेदारानेच दिली आहे. जर सुपरवायझर प्रत्यक्ष हजर होता, तर कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय हा २२ वर्षांचा तरुण विजेच्या खांबावर चढत असताना तो डोळे झाकून बसला होता का? ठेकेदाराच्या आणि त्याच्या सुपरवायझरच्या याच बेफिकीरीमुळे तरुणाला थेट मृत्यूच्या दाढेत ढकलले गेले, असा थेट आरोप नागरिक करत आहेत.

महाळुंगे पोलीस वरवरचा तपास करणार की 'सदोष मनुष्यवधाचा' गुन्हा दाखल करणार?

​चाकण ग्रामीण रुग्णालयात रवी दानवे यास आणले असता डॉक्टरांनी दुपारी १२:५४ वाजता मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालातही उंचावरून पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने (head injury due to fall from height) मृत्यू झाल्याचे नमूद आहे. सध्या उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मयत रजि. नं. ३०/२०२६ (बीएनएसएस कलम १९४) अन्वये नोंद करण्यात आली आहे. 

परंतु, ऐन सणाच्या दिवशी एका होतकरू तरुणाचा जीव निष्काळजीपणामुळे गेला असताना ठेकेदाराच्या बतावणीकडे डोळेझाक केली जाणार का? उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस केवळ कागदी घोडे नाचवून या प्रकरणावर पडदा टाकणार, की कामगाराच्या जिवाशी खेळणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा (Culpable Homicide) गुन्हा दाखल करून त्याला गजाआड करणार? याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी