Water Distribution || खराबवाडीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जि. प. सदस्य गणेश बोत्रे मैदानात; एमजीपी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत दिले कडक निर्देश..

Oct 30, 2026 - 10:26
 0
Water Distribution || खराबवाडीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जि. प. सदस्य गणेश बोत्रे मैदानात; एमजीपी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत दिले कडक निर्देश..

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : खराबवाडी परिसरातील एमजीपीएल पाईपलाईनमध्ये वारंवार होणारे बिघाड आणि त्यामुळे ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईची गंभीर दखल घेत, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्या पुढाकाराने ग्रामस्थ व प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची संयुक्त बैठक घेण्यात आली. नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न अग्रक्रमाने सोडवण्यासाठी गणेश बोत्रे यांनी प्रशासनाला धारेवर धरत काही तांत्रिक समस्या जागेवरच निकाली काढल्या.


​या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, मेदनकरवाडीचे पंचायत समिती सदस्य महिंद्र मेदनकर, पंचायत समितीचे संबंधित अधिकारी वर्ग, एमजीपी पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी तसेच खराबवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत ग्रामस्थांनी विस्कळीत पाणीपुरवठा, गळती आणि पाईपलाईनच्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. त्यावर गणेश बोत्रे यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत, "पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेबाबत कोणतीही टाळाटाळ किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही," अशी ठाम भूमिका घेतली. त्यांच्या थेट हस्तक्षेपामुळे बैठकीदरम्यानच तातडीने कार्यवाही करत पाणीपुरवठ्याशी निगडित काही महत्त्वाच्या अडचणींचे जागेवरच निराकरण करण्यात आले.


उर्वरित दुरुस्त्या आणि तांत्रिक त्रुटी येत्या काही दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करून खराबवाडी परिसराचा पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने व नियमित सुरू करण्याचे सक्त आदेश गणेश बोत्रे यांनी संबंधित यंत्रणेला दिले. नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असून, खराबवाडीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटेपर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील, असा ठाम विश्वास गणेश बोत्रे यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी