Crime Story || खराबवाडीत हॉटेलच्या ३०० रुपयांच्या बिलावरून मित्रावर कटरने जीवघेणा हल्ला; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला मोठा अनर्थ!

Oct 15, 2026 - 22:28
Oct 15, 2026 - 22:32
 0
Crime Story || खराबवाडीत हॉटेलच्या ३०० रुपयांच्या बिलावरून मित्रावर कटरने जीवघेणा हल्ला; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला मोठा अनर्थ!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : खराबवाडी (ता. खेड, जि. पुणे) परिसरामध्ये हॉटेलच्या बिलाच्या क्षुल्लक कारणावरून मित्रावर कटरने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, या घटनेनंतर पोलिसांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाय आणि पोलीस हवालदार राज हनुमंते यांच्या तत्परतेने जखमीचा जीव वाचला, नाहीतर येथे मोठी दुर्घटना घडली असती. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हॉटेलच्या बिलावरून वाद आणि कटरने वार:

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ९:०० वाजण्याच्या सुमारास मौजे खराबवाडी गावच्या हद्दीतील कडवस्ती येथे आशिष श्रीरामे यांच्या किराणा दुकानासमोर ही घटना घडली. फिर्यादी प्रांशु अच्छेलाल रावत (वय १६ वर्षे, मूळ रा. रायपुर, ता. सिगरीया, जि. रिवा, मध्य प्रदेश; सध्या रा. कडवस्ती, खराबवाडी) आणि त्याचा मित्र आरोपी अमर संतोष नायक (वय २१ वर्षे, रा. सहारा सिटी, खराबवाडी, ता. खेड) यांच्यात शिवराही हॉटेलच्या ३०० रुपयांच्या बिलाचे पैसे देण्यावरून वाद झाला. या कारणावरून आरोपी अमर नायक याने फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करत कटरने त्याच्या डाव्या गालावर कानाखाली वार करून गंभीर दुखापत केली.

पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण:

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाय आणि पोलीस हवालदार राज हनुमंते यांनी तात्काळ तत्परता दाखवत मदत कार्य केले. त्यांच्या या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि जखमी तरुणाचे प्राण वाचू शकले; अन्यथा या ठिकाणी आणखी मोठी दुर्घटना घडली असती. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त होत आहे.


👆शुभेच्छा बॅनर 👆

​आरोपीवर गुन्हा दाखल:

या प्रकरणी जखमी फिर्यादीच्या तक्रारीवरून दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी अमर संतोष नायक याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११८ (२), ३५१ (२) व ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 1
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 2
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी