Crime Update || चिंबळीत गुन्हे शाखेचा दणका: गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह दोघांना बेड्या; युनिट-४ ची धडक कारवाई..!

Oct 3, 2026 - 22:00
 0
Crime Update || चिंबळीत गुन्हे शाखेचा दणका: गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह दोघांना बेड्या; युनिट-४ ची धडक कारवाई..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

आळंदी : आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणासह त्याला पिस्तूल पुरवणाऱ्या साथीदाराला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून ५१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.


अमोल संभाजी गायकवाड (वय २९, सध्या रा. बर्गे वस्ती, चिंबळी, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. माहेगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) आणि महेंद्र दिलीप कोळी (वय २७, सध्या रा. मुटकेवाडी, चाकण, ता. खेड; मूळ रा. नायगाव, ता. यावल, जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बातमीदाराच्या माहितीवरून कारवाई...

गुन्हे शाखा युनिट-४ चे पथक हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई खराडे आणि पोलीस शिपाई वेताळ यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, बर्गे वस्ती (चिंबळी) येथील खदानीजवळ एका संशयित व्यक्तीकडे पिस्तूल आहे. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने धाड टाकून अमोल गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व १ जिवंत काडतूस मिळून आले.

पिस्तूल पुरवठादाराचा शोध घेऊन चाकणमधून अटक...

अमोल गायकवाड याच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, हे पिस्तूल त्याने चाकण येथील मुटकेवाडीत राहणाऱ्या महेंद्र दिलीप कोळी याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. पथकाने तात्काळ हालचाली करत मुटकेवाडी येथे छापा टाकून महेंद्र कोळी यालाही ताब्यात घेतले. या प्रकरणी दोघांविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा (आर्म्स ॲक्ट) कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

कारवाईचे पथक..

सदर धडक कारवाई गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले, पोलीस हवालदार बोराटे, पोलीस शिपाई खराडे, वेताळ, मेरगळ,माटे आणि बाळसराफ यांच्या पथकाने केली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 2
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी