मोठी बातमी || महाळुंगे इंगळेच्या ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये संतापजनक प्रकार; विद्यार्थ्यांच्या अंगावर वळ उठवेपर्यंत क्रूर शिक्षकाची जबरी मारहाण!

Aug 6, 2026 - 18:39
Aug 6, 2026 - 18:42
 0
मोठी बातमी || महाळुंगे इंगळेच्या ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये संतापजनक प्रकार; विद्यार्थ्यांच्या अंगावर वळ उठवेपर्यंत क्रूर शिक्षकाची जबरी मारहाण!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण :: खेड तालुक्यातील चाकण परिसरातील महाळुंगे इंगळे येथील ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये एका उद्धट आणि विकृत शिक्षकाने ९ वीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या क्रूर मारहाणीमुळे संतप्त पालक वर्गात तीव्र रोष उसळला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकी घटना?

​मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कुलमधील दिपज्योती दास नावाचा हा विकृत शिक्षक ९ वीच्या वर्गाला शिकवणीला नसतानाही विनाकारण वर्गात घुसला. वर्गात एक मुलगी हसली या क्षुल्लक कारणावरून त्याने त्या मुलीला वर्गाच्या बाहेर काढून उठाबशा काढायला लावल्या. मुलींनी हात जोडून विनवणी केली, "सर, आम्हाला इतर कोणतीही शिक्षा द्या, पण उठाबशा काढायला लावू नका," असे सांगितले तरीही या क्रूर शिक्षकाचे काळीज पघळले नाही. त्याने कसलाही विचार न करता थेट लाकडी काठीने त्या मुलींना अमानुष मारहाण केली.


तसेच, याच वर्गातील इतर दोन मुले आपापसात शालेय साहित्य एकमेकांना देत असताना, त्यांनाही कोणतीही पूर्वकल्पना किंवा कारण न विचारता थेट बेदम मारहाण करण्यात आली. या नराधम शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थ्यांच्या कोवळ्या अंगावर लाल बुंद वळ उठल्याचे पाहून पालकांचे काळीज पिळवटून निघाले.


शिक्षकाची मुजोरी आणि मुख्याध्यापकांचा संशयास्पद कारभार..

​मारहाण केल्यानंतरही या विकृत शिक्षकाची मस्ती कमी झाली नाही. त्याने रागाच्या भरात शाळेच्या शिक्षक खोलीच्या (स्टाफ रूमच्या) काचा स्वतः हाताने फोडल्या आणि "माझं कोणीही वाकडे करू शकत नाही," अशी धमकी देत अरेरावी केली. विशेष म्हणजे, एवढी गंभीर घटना घडूनही जसे काही झालेच नाही, अशा अविर्भावात हा शिक्षक वावरत होता.

याप्रकरणी जेव्हा संतप्त पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना जाब विचारला, तेव्हा त्यांनी कोणतेही ठोस उत्तर देणे टाळले. उलटपक्षी, शिक्षकाची पाठराखण करत हा सर्व प्रकार पालकांनी आपापसात मिटवून घ्यावा, याघटनेबद्दल शाळेचे सचिव पोलीस ठाण्यात पालकांची विनवणी करत असल्याचे समोर आले आहे. मुख्याध्यापकांच्या या भूमिकेमुळे पालकांचा संताप आणखीनच अनावर झाला आहे.


पालकांचा आक्रमक पवित्रा; शिक्षक पोलिसांच्या ताब्यात..

​विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि शाळांना कलंक ठरवणाऱ्या या क्रूर शिक्षकाच्या विरोधात पालकांनी व शाळा प्रशासनाने कठोर पावले उचलत आरोपी शिक्षक दिपज्योत दास याला दक्षिण महाळुंगे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यावेळी शाळेच्या प्रशासनाने झालेली घटना चुकीची आहे हे मान्य करून आम्ही त्या शिक्षकावर कडक कारवाई करून त्याला शाळेतून काढून टाकण्याची लेखी हमी पालकांना दिल्याची माहिती मिळाली आहे. 

पण यापुढे ज्या शिक्षकांवर विद्यार्थ्यांचे दुसरे पालक म्हणून जबाबदारी असते अशा शिक्षकाकडून जर असे क्रूर कृत्य होतं असेल तर अशा शिक्षक आणि शाळेबद्दल न बोलले बरे अशीच काहीशी परिस्थिती परिसरात निर्माण झाली आहे.


What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 4
Love Love 0
Funny Funny 1
Angry Angry 37
Sad Sad 7
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी