श्रावण मासानिमित्त अड्याळमध्ये भव्य कावड यात्रा...
प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार, भंडारा
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील प्रसिद्ध हनुमान मंदिर, अड्याळ येथे श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कावड यात्रा २५ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ९ वाजता हनुमान मंदिरातून मोठ्या भक्तिमय वातावरणात निघणार आहे. श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वानिमित्त आयोजित या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
कावड यात्रा हा धार्मिक उत्सव भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे परिसरातील समस्त ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र कावड यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन हनुमान मंदिर, अड्याळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ठिकाण : हनुमान मंदिर, अड्याळ
दिनांक : २५ ऑगस्ट
वेळ : सकाळी ९ वाजता
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1