गायराण कारवाई || खराबवाडीतील गायराण अतिक्रमण व महसूली त्रुटींसंदर्भात मंत्रालयात महत्त्वाची बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलावले ग्रामस्थांना मुंबईला...!

Aug 14, 2026 - 15:43
 0
गायराण कारवाई || खराबवाडीतील गायराण अतिक्रमण व महसूली त्रुटींसंदर्भात मंत्रालयात महत्त्वाची बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलावले ग्रामस्थांना मुंबईला...!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

पुणे :: खेड तालुक्यातील खराबवाडी गावातील गायराण क्षेत्रावरील अतिक्रमण काढू नये आणि गावातील विविध महसूली त्रुटी दूर कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी खराबवाडी गावातील ग्रामस्थांच्या एका प्रतिनिधी मंडळाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. महसूल मंत्री यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी त्यांना सविस्तर निवेदन देत आपली बाजू मांडली.

ग्रामस्थांच्या या निवेदनाची आणि समस्येची गांभीर्याने दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी येत्या मंगळवार, दिनांक १८ रोजी मंत्रालयात खराबवाडीच्या ग्रामस्थांसोबत एका विशेष व अधिकृत उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. गायरान धारक ग्रामस्थांच्या बरोबर राज्य सरकार असून सरकारच्या माध्यमातूनही न्यायालयीन प्रक्रियेसाठी वकिलांची मदत करण्याचीही ग्वाही मंत्री बावनकुळे यांनी ग्रामस्थांना दिली आहे.

​या बैठकीसाठी महसूल विभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, यामध्ये खराबवाडी गावकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करून कायदेशीर व योग्य तो निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या घडामोडीमुळे खराबवाडी गावातील ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

यावेळी या शिष्टमंडळात प्रामुख्याने संदीप सोमवंशी (उपाध्यक्ष, भाजपा पुणे जिल्हा), क्रांती सोमवंशी (माजी उपसभापती, खेड बाजार समिती) आणि अरुण सोमवंशी (संचालक, खेड खरेदी विक्री संघ) हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तर गावातील सचिन काळुराम कड, विश्वास विनायक कड, निवृत्ती भिकाजी सोमवंशी, अतुल मच्छिन्द्र कड, गौरव सुनील खराबी, निलेश शिवाजी सातव, सहादु शिवराम साठे, दत्ताराज एकनाथ साठे, अर्जुन सोपान खराबी, राजेंद्र मुकुंदा चौगुले, सचिन श्याम केसवड आणि चंद्रकांत राऊत हे सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 1
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी