शैक्षणिक || वक्तृत्व स्पर्धेत काव्या किर्तेचा डंका! आण्णासाहेब बुट्टेपाटील जयंतीनिमित्त ६८ शाळांच्या विद्यार्थ्यांची वैचारिक जुगलबंदी...!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण :: आण्णासाहेब बुट्टेपाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातील ६८ शाळांमधील बालवक्त्यांनी आपल्या प्रभावी विचारांची छाप पाडली. या चुरशीच्या स्पर्धेत आपल्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांची मने जिंकत काव्या किरण किर्ते हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला रोख ५,००० रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत दोन गटांत स्पर्धा पार पडली. यामध्ये लहान गटातून ३९, तर मोठ्या गटातून २९ अशा एकूण ६८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक व चालू घडामोडींवर परखड मते मांडली.
स्पर्धेचे निष्पक्ष परीक्षण ६ तज्ज्ञ परीक्षकांनी केले. यामध्ये हनुमंत कुबडे, दिलीप कसबे, सुरेश सुरनाळे, अभिजित बेंडाले, नारायण करपे आणि चैत्राली रोकडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजित बुट्टेपाटील उपस्थित होते. याप्रसंगी उपाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, उपाध्यक्ष विनोद पाचपुते, सचिव विलास काळे, शिक्षण समिती अध्यक्ष निशांत करंडे यांच्यासह संचालक सुनीलराव घनवट, अजित पाचपुते, प्रकाश लिंभोरे, किरण पाचपुते आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमात सुरुवात सल्लागार बाळासाहेब लिंभोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वक्तृत्वाचे महत्त्व आणि व्यक्तिमत्त्व विकासावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन चंद्रकांत बुट्टे सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रमेश बोऱ्हाडे सर यांनी मानले. तालुक्यातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
2
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1