मोठी बातमी : ​‘शिक्षण माफियांचा’ नंगानाच! गायत्री इंटरनॅशनल स्कूल आणि सरस्वती स्टोअरचे संगनमत; पालकांची सर्रास लूट.?

राजकीय वरदहस्त लाभलेल्या शाळेची मुजोरी; साहित्यामागे लाटले हजारो रुपये!

Jun 13, 2026 - 13:16
 0
मोठी बातमी : ​‘शिक्षण माफियांचा’ नंगानाच! गायत्री इंटरनॅशनल स्कूल आणि सरस्वती स्टोअरचे संगनमत; पालकांची सर्रास लूट.?

लोकन्याय मराठी विशेष प्रतिनिधी 

भोसरी : भोसरीतील जय गणेश साम्राज्य परिसरातील गायत्री इंटरनॅशनल स्कूलने शिक्षणाचे बाजारीकरण करत पालकांच्या खिशावर दरोडा टाकला आहे. सरस्वती डिपार्टमेंटल स्टोअरशी संगनमत करून, शाळेने शालेय साहित्याच्या नावाखाली पालकांची अक्षरशः लूट सुरू केली आहे. एका विद्यार्थ्याच्या साहित्यामागे तब्बल एक हजारापेक्षा जास्त रक्कम जादा आकारून, शाळा प्रशासनाने आपल्या ‘शिक्षण माफिया’ असण्याचा पुरावाच दिला आहे.

शाळेचा खोटारडा कारभार आणि शिक्षिकांची मिलीभगत..

जेव्हा या लूटमारीबाबत मुख्याध्यापकांकडे जाब विचारला, तेव्हा त्यांनी “स्टोअरशी आमचा काहीही संबंध नाही,” अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन हात झटकले. जर शाळा आणि त्या स्टोअरचा संबंध नाही, तर शाळेच्या शिक्षिका तिथे उपस्थित राहून पुस्तक वाटपात काय करत होत्या? हा प्रश्न आता गंभीर बनला आहे. स्पष्टपणे शाळा आणि स्टोअरची हातमिळवणी असून, पालकांना एकाच दुकानातून साहित्य घेण्यास भाग पाडले जात आहे.

राजकीय ‘दबदबा’ की पालकांची ‘लुबाडणूक’?

स्थानिक नगरसेविकेच्या मालकीची असलेली ही शाळा, राजकीय शक्तीचा गैरवापर करत पालकांवर दबाव टाकत आहे का? असा संतापजनक प्रश्न विचारला जात आहे. “आम्ही पोटाला चिमटा काढून मुलांना शिक्षण देतो, पण ही शाळा आमच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारत आहे,” अशा उदिग्न प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहेत.

पालकांचे सवाल: ‘सेवा’ शुल्क की ‘लूट’ शुल्क?

काही जागरूक पालकांनी या फसवणुकीची विचारणा केली असता, शाळा प्रशासनाने ‘वाहतूक खर्च’ आणि ‘वाटप खर्चाच्या’ नावाखाली पालकांना वेठीस धरण्याचे धाडस केले आहे. गोरगरीब पालकांचा वेळ आणि श्रमाचा विचार न करता, ही शाळा मनमानी वसुली करून पालकांना वेड्यात काढत आहे.

शिक्षण विभाग गप्प का?

राजकीय वरदहस्त असल्याने शिक्षण विभाग या प्रकारावर कारवाई करणार की नाही, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरेल. पालकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, या शाळा आणि स्टोअरवर त्वरित कायदेशीर कारवाई न झाल्यास आम्ही वरिष्ठ स्तरावर आंदोलनाचा पवित्रा घेऊ, असा इशारा पालकांनी दिला आहे.

शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणाऱ्या या शाळा प्रशासनावर आणि संगनमत करणाऱ्या स्टोअरवर आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा शिक्षण विभाग काय कारवाई करतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी