Fraud Girl || स्वामी समर्थांची खोटी शपथ अन् अश्रूंचा बाजार!' सोशल मीडियावर तरुणांना गंडा घालणाऱ्या शारदा काळोखेचा पर्दाफाश; शिक्रापूर-शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची तयारी..!

Oct 8, 2026 - 11:08
 0
Fraud Girl || स्वामी समर्थांची खोटी शपथ अन् अश्रूंचा बाजार!' सोशल मीडियावर तरुणांना गंडा घालणाऱ्या शारदा काळोखेचा पर्दाफाश; शिक्रापूर-शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची तयारी..!

लोकन्याय मराठी विशेष प्रतिनिधी 

शिरूर(पुणे) : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना भावनिक जाळ्यात ओढून, देवाधर्माच्या खोट्या शपथा घेत हजारो रुपये उकळणाऱ्या एका तरुणीचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. शारदा लक्ष्मीकांत काळोखे असे या भामटेगिरी करणाऱ्या तरुणीचे नाव असून, व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून ती तरुणांची आर्थिक लूट करत असल्याचे उघड झाले आहे.


असा चालतो फसवणुकीचा गोरखधंदा:

• खोट्या शपथा आणि भावनिक ब्लॅकमेल: स्वतःचे फोटो आणि रडतानाचे व्हिडिओ पाठवून "मी खूप अडचणीत आहे, तुमच्या पाया पडते, हात जोडते" असा बनाव करायचा. यामध्ये चक्क आईची, स्वर्गवासी वडिलांची आणि थेट स्वामी समर्थांची खोटी शपथ घेऊन तरुणांकडून सहानुभूती मिळवली जाते.

• ​पत्ता बदलून दिशाभूल: विश्वास संपादन करण्यासाठी कधी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार, कधी राहुरी, तर सध्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे असल्याचे सांगून दिशाभूल केली जात आहे.

• ​हजारो रुपयांची लूट: भावनिक जाळ्यात अडकवून अडचणीचे कारण सांगायचे आणि तरुणांकडून परस्पर ऑनलाईन हजारो रुपये उकळायचे, असा तिचा ठरलेला पॅटर्न आहे.


पोलीस ठाण्यात धडकणार तक्रार; संघटना आक्रमक..

शारदा काळोखे हिच्या या वाढत्या लुटीला चाप लावण्यासाठी आता सामाजिक संघटना आणि फसवणूक झालेले तरुण पुढे आले आहेत. याप्रकरणी पुणे, शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात रीतसर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नागरिक व तरुणांना सतर्कतेचे आवाहन...

​शारदा काळोखे नावाने जर कोणाला व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुकवर मेसेज, व्हिडिओ अथवा पैशांची मागणी आली, तर कोणत्याही भावनिक आव्हानाला बळी पडू नका. अशा प्रकारच्या मेसेजला प्रतिसाद न देता तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. आता पोलीस या भामट्या तरुणीच्या मुसक्या कधी आवळतात आणि तिच्या जाळ्यात आणखी कोण कोण अडकले आहे, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी