Criminal Update || प्रतिपंढरपूर कडूसमध्ये संतापाची लाट; गोहत्येच्या निषेधार्थ आज 'कडूस बंद'ची हाक, धडकणार भव्य मोर्चा..!

Sep 1, 2026 - 09:21
 0
Criminal Update || प्रतिपंढरपूर कडूसमध्ये संतापाची लाट; गोहत्येच्या निषेधार्थ आज 'कडूस बंद'ची हाक, धडकणार भव्य मोर्चा..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

कडूस(खेड) : प्रति पंढरपूर' म्हणून ओळख असणाऱ्या श्रीक्षेत्र कडूस येथे घडलेल्या गोहत्येच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आज, १ सप्टेंबर रोजी कडूस गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बजरंग दल (कडूस शाखा) आणि गोरक्षा विभागाच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला असून संपूर्ण गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

हिंदू धर्मातील पवित्र श्रावणी सोमवार आणि गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला कडूस परिसरातील तुरुकवाडी येथे काही समाजकंटकांनी दोन गोमातांची निर्घृण कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार ३१ ऑगस्ट रोजी समोर आला. यापूर्वीही आषाढी एकादशीसारख्या पवित्र दिवशी अशाच प्रकारे गोहत्या करण्यात आली होती. हिंदूंच्या सणांच्या दिवशी जाणीवपूर्वक असे प्रकार करून धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.


आज सकाळी १० वाजता निघणार भव्य निषेध मोर्चा...

या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज सकाळी १०:०० वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा श्री भैरवनाथ महाराज मंदिरापासून सुरू होऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडकणार आहे.

​या निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी आणि गोवंश हत्या करणाऱ्या समाजकंटकांना चाप लावण्यासाठी सर्व ग्रामस्थ, व्यापारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सहभागी होऊन मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी