Gang Rape || शिरूरमध्ये माणुसकी वेशीवर टांगली! २२ वर्षीय तरुणीवर लॉजमध्ये गँगरेप; ७ वासनांधीनाना फाशीची शिक्षा देण्याची जनतेतून मागणी..!

अजून किती अत्याचार झाल्यावर सरकारचे डोळे उघडणार..!

Aug 22, 2026 - 21:54
Aug 22, 2026 - 21:55
 0
Gang Rape || शिरूरमध्ये माणुसकी वेशीवर टांगली! २२ वर्षीय तरुणीवर लॉजमध्ये गँगरेप; ७ वासनांधीनाना फाशीची शिक्षा देण्याची जनतेतून मागणी..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

शिरूर :: पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात मानवतेला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे. चांगल्या पगाराच्या कामाचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय परप्रांतीय तरुणीला लॉजवर नेत, तिच्यावर गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार (गँगरेप) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एकूण ७ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नशायुक्त पावडर देऊन सलग दोन दिवस अत्याचार.. 

मिळालेल्या माहितीनुसार, मूळ छत्तीसगड येथील रहिवासी असलेली आणि सध्या चाकणजवळील खराबवाडी येथे वास्तव्यास असणारी २२ वर्षीय पीडित तरुणी नोकरीच्या शोधात होती. संशयित आरोपींनी तिला चांगल्या पैशांचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि कारमधून शिरूर येथील ‘हॉटेल मार्वल इन लॉजिंग’ येथे आणले.

दिनांक १९ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान, आरोपींनी पीडितेला पांढऱ्या रंगाची नशा येणारी पावडर जबरदस्तीने खाऊ घालून तिची शुद्ध हरपवली. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध, बेदम अत्याचार करत वारंवार सामूहिक बलात्कार केला. तसेच इतर आरोपींनी तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

गुन्हा दाखल झालेले आरोपी:

१. दीपक श्रीमंदीलकर, २. अजय घेगडे, ३. ऋषीकेश ढवळे, ४. दीपक भोसले, ५. सागर ढवळे, ६. अनिकेत पठारे, ७. एक अनोळखी इसम सर्व नराधमांना फाशी किंवा कठोर जन्मठेप देण्याची जनतेतून मागणी होत आहे. 

शिरूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर ७५६/२०२६ नुसार भा.न्या.सं. कलम ६४, ७०(१), ७४, ७६, १२३, १२७(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नकाते करत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे. निष्पाप परप्रांतीय तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर पाशवी अत्याचार करणाऱ्या अशा वासनांध नराधमांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना फाशी किंवा जन्मठेपेसारखी अत्यंत कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असा संताप सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 3
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी