Political Drama || सोसायटीत स्वतःचा राजकीय डाव साधला, अन् इकडे चुलत्याच्या खुर्चीला सुरुंग! वाडा ग्रामपंचायतीत राजकीय भूकंप; उपसरपंच रोहिदास शेटेंवर अविश्वास ठराव दाखल..!

Sep 12, 2026 - 10:58
 0
Political Drama || सोसायटीत स्वतःचा राजकीय डाव साधला, अन् इकडे चुलत्याच्या खुर्चीला सुरुंग! वाडा ग्रामपंचायतीत राजकीय भूकंप; उपसरपंच रोहिदास शेटेंवर अविश्वास ठराव दाखल..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे patil 

वाडा (खेड) : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या वाडा ग्रामपंचायतीमध्ये मोठा राजकीय स्फोट झाला आहे. वाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच रोहिदास महादेव शेटे यांच्या मनमानी आणि एकाधिकारशाही कारभाराला कंटाळून बहुसंख्य ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध थेट अविश्वास ठराव दाखल केला आहे. रोहिदास शेटे हे स्वर्गीय सहकार महर्षी बाळासाहेब शेटे यांचे लहान बंधू तसेच कात्रज डेअरीचे माजी संचालक व वाडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन शेखर शेटे यांचे सख्खे चुलते आहेत. एकीकडे सोसायटीत स्वतःचे राजकीय वजन दाखवणाऱ्या शेखर शेटे यांच्या चुलत्याचीच ग्रामपंचायतीत ‘विकेट’ काढण्याची रणनीती आखल्याने संपूर्ण खेड तालुक्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

👇उपसरपंच रोहिदास शेटे यांच्यावर अविश्वास दाखल..


नेमका वाद काय? शब्दाला जागले नाहीत, म्हणून बंडाचे निशाण.!

​ग्रामपंचायत निवडणुकीनंतर उपसरपंच पदाची खुर्ची ही अल्प कालावधीसाठी देण्याचे ठरले होते. ठरलेल्या मुदतीनुसार रोहिदास शेटे यांनी पदाचा राजीनामा देऊन इतर सदस्यांना संधी देणे अपेक्षित होते. मात्र, दिलेल्या शब्दाला हरताळ फासत त्यांनी पदावर अडून राहण्याची भूमिका घेतली. त्यांच्या याच मनमानी आणि सहकाऱ्यांना गृहीत धरण्याच्या वृत्तीमुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. अखेर संयमाचा बांध फुटल्याने सरपंच सौ. रूपाली शिवाजी भारे यांच्यासह बहुसंख्य ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत खेड तहसील कार्यालयात रोहिदास शेटे यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावाचा अधिकृत अर्ज दाखल केला. १० सप्टेंबर २०२६ रोजी दाखल करण्यात आलेल्या या अर्जावर तातडीने कायदेशीर कार्यवाही करून विशेष सभा बोलावण्याची मागणी सदस्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

👇 चुलत्यांवर दाखल केलेल्या अविश्वास ठरावाने शेखर शेटे यांना धक्का..


सोसायटीत ‘ठराव’, पण ग्रामपंचायतीत ‘धक्का’.!

या संपूर्ण राजकीय संघर्षाला वाडा सोसायटीमधील ‘पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ (PDCC Bank) प्रतिनिधी निवडीची थेट किनार असल्याची जोरदार चर्चा गावात सुरू आहे. वाडा सोसायटीचे विद्यमान चेअरमन शेखर शेटे यांनी स्वतःचा पीडीसीसी बँक प्रतिनिधीचा ठराव मोठ्या हुशारीने मंजूर करून घेतला. मात्र, सोसायटीत स्वतःची पोळी भाजून घेत असतानाच, त्यांच्या स्वतःच्या गावात आणि ग्रामपंचायतीत चुलते रोहिदास शेटे यांच्यावर अविश्वासाची नामुष्की ओढवली. त्यामुळे सोसायटीत विजय मिळवला तरी ग्रामपंचायतीत मोठा राजकीय सेटबॅक बसल्याने शेखर शेटे यांना हा अत्यंत जिव्हारी लागणारा दणका मानला जात आहे.

समीर सुपेंनी हलवली अचूक राजकीय सूत्रे!

​या संपूर्ण अविश्वास नाट्याची पडद्यामागची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हलवल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व असंतुष्ट सदस्यांची मोट बांधून त्यांनी शेटे यांच्या राजकीय मक्तेदारीला जोरदार आव्हान दिले आहे.

👇वाडा सोसायटीच्या बँक प्रतिनिधी निवडीचे जिल्हा परिषद सदस्य समिर सुपे उट्टे काढणार?


या राजकीय घडामोडींवर बोलताना जि. प. सदस्य समीर सुपे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत शेटे यांच्या कारभाराचा पंचनामा केला. ते म्हणाले की:

​"त्यांनी (शेखर शेटे) सुरुवातीला आम्हाला असे सांगितले होते की, 'मला बँकेचा प्रतिनिधी द्या, म्हणजे माझ्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी मला माजी आमदारांकडे जाता येईल व ती कामे मार्गी लावता येतील.' आम्ही त्यावर विश्वास ठेवला; मात्र ऐनवेळी त्यांनी आपला दिलेला शब्द बदलून अत्यंत संभ्रमित आणि दुटप्पी भूमिका घेतली.

सोसायटीमध्ये स्वतःचे चेअरमनपद केवळ दोन वर्षांसाठीच ठरलेले असताना, उर्वरित संचालकांना अजिबात विश्वासात न घेता त्यांनी स्वतःची एकाधिकारशाही सुरूच ठेवली. दुर्दैवाने, जी एकाधिकारशाही सोसायटीत चालवली, तीच मनमानी आणि हुकूमशाही ग्रामपंचायतीमध्ये त्यांचे चुलते रोहिदास शेटे यांनीही सुरू ठेवली होती. कोणालाही विश्वासात न घेणे, शब्द न पाळणे आणि गावाला वेठीस धरणे हीच यांची कार्यपद्धती झाली होती. म्हणूनच अखेर नाईलाजास्तव वाड्याच्या स्वाभिमानासाठी आणि गावाच्या विकासासाठी आम्हाला उपसरपंचांवर हा अविश्वास ठराव दाखल करावा लागला आहे."

तहसीलदारांच्या विशेष सभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष.!

​वाडा ग्रामपंचायतीमध्ये दाखल झालेल्या या अविश्वास अर्जावर सरपंच सौ. रूपाली शिवाजी भारे यांच्यासह महेश लक्ष्मण नेहरे, नीलेश शिवाजी धनवट, सौ. प्रतिमा नीलेश वांभुरे, सौ. सुनंदा संजय भोसे, सौ. सुरेखा विनोद सुपे, दगडू ज्ञानदेव भांगे, दिलीप शंकर सुपे, सौ. सुभद्रा बाळासाहेब आहेर आदी सदस्यांच्या सह्या आहेत.


​आता खेड तहसीलदार यावर कधी विशेष सभा आयोजित करतात आणि या विशेष सभेत रोहिदास शेटे यांच्यावर अविश्वासाचा शिक्कामोर्तब कसा होतो, याकडे संपूर्ण पश्चिम पट्ट्यासह खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे. एकंदरीत, वाड्याच्या राजकारणातील या आक्रमक खेळीने तालुक्यात आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी