Bank Election Drama || PDCC बँकेच्या निवडणुकीत खळबळ! खेडमध्ये मतांच्या गणितासाठी महिलेचं अपहरण; माजी सभापतींसह तिघांवर गुन्हा!

Sep 10, 2026 - 06:59
 0
Bank Election Drama || PDCC बँकेच्या निवडणुकीत खळबळ! खेडमध्ये मतांच्या गणितासाठी महिलेचं अपहरण; माजी सभापतींसह तिघांवर गुन्हा!

लोकन्याय विशेष प्रतिनिधी 

राजगुरूनगर(खेड) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची चुरस आता धक्कादायक आणि थेट गुन्हेगारी वळणावर पोहोचली आहे. खेड तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या मतदार प्रतिनिधी निवडीवरून राजकीय वातावरण तापलं असतानाच, एका ४७ वर्षीय महिला मतदाराचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात खेड पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांच्यासह तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

PDCC बँकेच्या निवडणुकीत आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. याच राजकीय चुरशीतून आंबोली गावात ही धक्कादायक घटना घडली. ५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास, खेड पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश लक्ष्मण शिंदे, लक्ष्मण शिंदे आणि मंगल शिंदे हे तिघे स्थानिक रहिवासी अतुल शिंदे यांच्या घरी पोहोचले. जिल्हा बँकेच्या प्रतिनिधी निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची चर्चा करायची असल्याचा बहाणा करून, त्यांनी अतुल यांच्या आई पुष्पा शिंदे यांना सोबत खेड येथे नेण्याचा आग्रह धरला.

पुष्पा शिंदे यांना MH 14 HK 6606 या क्रमांकाच्या ह्युंदाई क्रेटा गाडीतून नेण्यात आले. मात्र, संध्याकाळ उलटून गेली तरी पुष्पा शिंदे घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल फोनही बंद येत होता.

कुटुंबीयांनी संभाव्य ठिकाणी शोध घेतला; मात्र तीन दिवस उलटूनही पुष्पा शिंदे यांचा कोणताच थांगपत्ता न लागल्याने अखेर मुलगा अतुल शिंदे यांनी थेट खेड पोलीस ठाणे गाठले.

गुन्हा दाखल झालेले संशयित:

• ​सुरेश लक्ष्मण शिंदे – माजी सभापती, खेड पंचायत समिती (रा. आंबोली)

• ​लक्ष्मण धोंडू शिंदे (रा. आंबोली)

• ​मंगल लक्ष्मण शिंदे (रा. आंबोली)

तक्रारदार व अपहृत व्यक्ती:

• ​फिर्यादी: अतुल दत्तात्रय शिंदे (वय २७ वर्षे, रा. आंबोली)

• ​अपहृत महिला: पुष्पा दत्तात्रय शिंदे (वय ४७ वर्षे, अतुल शिंदे यांच्या आई)

मतदारांवर दबाव आणण्यासाठी थेट अपहरणासारखा मार्ग अवलंबला गेल्याचा आरोप झाल्याने सहकार वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अतुल शिंदे यांच्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी माजी सभापती सुरेश शिंदे यांच्यासह तिघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, पुष्पा शिंदे यांचा शोध आणि पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी