Political Activity || सहकार क्षेत्रात सक्षम नेतृत्वाला कौल: काळूस-पवळेवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आनंदा पवळे यांची बिनविरोध निवड..!

Oct 17, 2026 - 19:19
 0
Political Activity || सहकार क्षेत्रात सक्षम नेतृत्वाला कौल: काळूस-पवळेवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आनंदा पवळे यांची बिनविरोध निवड..!

लोकन्याय प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

काळुस(ता. खेड) : काळूस-पवळेवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी श्री. आनंदा नामदेव पवळे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. एक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सक्षम नेतृत्व म्हणून सुपरिचित असलेल्या पवळे यांच्या निवडीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत आहे.


आनंदा नामदेव पवळे हे काळेश्वर दिंडीचे सचिव म्हणून धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहेत. आपल्या निष्कलंक व सेवाभावी कार्यपद्धतीमुळे त्यांनी जनमानसात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक अनुभवाचा आणि दूरदृष्टीचा फायदा संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासाठी व विकासासाठी निश्चितच होईल, तसेच ते संस्थेच्या सर्व सभासदांच्या हिताला अग्रक्रम देऊन पारदर्शक कारभार करतील, असा ठाम विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

​या निवडीनंतर जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे, बाजार समिती संचालक पै. विनोद (पप्पूदादा) टोपे तसेच गौरव टोपे यांनी आनंदा पवळे यांचे विशेष अभिनंदन करत पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सोसायटीच्या संचालक मंडळातील सर्व सदस्य सचिन अरगडे, लहू पोतवडे, धनश्री पवळे, गणेश पवळे, अनिल येळवंडे, विक्रम पवळे, मोहन पवळे, भाऊसाहेब वाटेकर, संभाजी वाटेकर, अनुसया पवळे आणि राजू मैद यांनीही नवनिर्वाचित चेअरमन आनंदा पवळे यांचे मनःपूर्वक सत्कार करून संस्थेच्या उत्कर्षासाठी सदैव पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी