कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अड्याळ पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन...
भंडारा प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार
गणेशोत्सव आनंदाने साजरा करा; पोलिसांना सहकार्य करा - ठाणेदार सचिन तायवाडे
कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अड्याळ पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव आनंदाने, उत्साहात आणि शांततेत साजरा करावा, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अड्याळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन तायवाडे यांनी केले आहे.
गणेशोत्सव काळात मंडळांनी पोलिस प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित ठेवण्यास प्रत्येक मंडळाने सहकार्य करावे, असेही ठाणेदार तायवाडे यांनी सांगितले.
दरम्यान, आगामी सण-उत्सवाच्या काळात सोशल मीडियावर अफवा, आक्षेपार्ह किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रसारित करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सोशल मीडियावर अशी कोणतीही पोस्ट किंवा माहिती निदर्शनास आल्यास ती पुढे प्रसारित न करता तातडीने पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी.
गणेश विसर्जन मिरवणुका तसेच उत्सवाच्या काळात नागरिकांनी संयम बाळगून पोलिसांना सहकार्य करावे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ठाणेदार सचिन तायवाडे यांनी केले आहे.
“गणेशोत्सव आनंदाचा आणि एकोप्याचा उत्सव आहे. शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा राखत उत्सव साजरा करा,” असा संदेश अड्याळ पोलिसांकडून देण्यात आला आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0