MIDC Activity || चाकणच्या विकासाची 'फाल्सी' स्वप्ने: सुविधांचे धिंडवडे निघाल्याने २० लघुउद्योग खंडाळा एमआयडीसीच्या वाटेवर, प्रशासनाच्या डोळ्यांसमोरच कोट्यवधींची उलाढाल आणि हजारो कामगारांचे भवितव्य अंधारात!

"कर गोळा करण्यात अव्वल, तर पायाभूत सुविधा देण्यात शून्य!" — चाकण औद्योगिक वसाहतीची आजची हीच खरी दयनीय अवस्था बनली आहे.

Aug 11, 2026 - 10:14
 0
MIDC Activity || चाकणच्या विकासाची 'फाल्सी' स्वप्ने: सुविधांचे धिंडवडे निघाल्याने २० लघुउद्योग खंडाळा एमआयडीसीच्या वाटेवर, प्रशासनाच्या डोळ्यांसमोरच कोट्यवधींची उलाढाल आणि हजारो कामगारांचे भवितव्य अंधारात!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : अमेरिकेतील 'डेट्रॉईट' म्हणून जागतिक पातळीवर ख्याती असलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीला प्रशासकीय अनास्थेमुळे अखेर 'पॅकअप'चा मोठा धक्का बसला आहे. पायाभूत सुविधांचा तीव्र अभाव, निकृष्ट रस्ते, वारंवार जाणवणारी वीजटंचाई आणि स्थानिकांची मुजोरी यांमुळे वैतागून गेलेल्या २० लघुउद्योजकांनी अखेर चाकणला रामराम ठोकून साताऱ्यातील खंडाळा एमआयडीसीकडे स्थलांतराचा मार्ग धरला आहे.

प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने आणि कोणत्याही ठोस उपाययोजना होताना दिसत नसल्यानेच उद्योजकांवर ही वाईट वेळ ओढावली आहे. या स्थलांतरामुळे १ हजार कोटी रुपयांची उलाढाल आणि ४ ते ५ हजार कामगारांचे भवितव्य अक्षरशः टांगणीला लागले आहे.

प्रमुख मुद्दे आणि समस्या...

• प्रशासकीय उदासीनता आणि सुविधांचा बोजवारा:

चाकणमध्ये एमआयडीसी, पीएमआरडीए आणि स्थानिक ग्रामपंचायतीकडून भरमसाठ कर वसूल केला जातो, मात्र बदल्यात नावालाही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. दिवसातून ६ ते ७ वेळा वीज खंडित होणे, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि पिण्याच्या पाण्यासाठीही करावी लागणारी वणवण यांमुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत.

• मृत्यूचा सापळा बनलेले रस्ते आणि वाहतूक कोंडी:

पुणे-नाशिक महामार्ग तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाची चाळण झाली आहे. एमआयडीसी अंतर्गत रस्तेही निकृष्ट दर्जाचे असल्याने वारंवार खड्डे पडतात. परिणामी, होणारी भीषण वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे हा मार्ग कामगारांसाठी 'मृत्यूचा सापळा' ठरत असून माल वेळेवर पोहोचणेही अशक्य झाले आहे.

• स्थानिक गुन्हेगारी आणि ठेकेदारीचा ससेमिरा:

कंपन्यांमध्ये ठेके आणि माथाडी कामगार मिळवण्यासाठी स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि गुंडांची चालणारी अरेरावी उद्योजकांच्या जीवावर आली आहे. "आम्हीच कामगार पुरवणार आणि ठेका आम्हालाच पाहिजे," या मुजोरीमुळे उद्योजक आणि प्रशासन यांच्यात सातत्याने संघर्ष उभा राहत आहे.

उद्योजकांची संतप्त प्रतिक्रिया...

"भरमसाठ कर वसूल करूनही सुविधा दिल्या जात नाहीत. वीज नसते, वाहतूक कोंडीमुळे कामगार वेळेवर पोहचत नाहीत, पाणी विकत घ्यावे लागते. या एक ना अनेक समस्यांना तोंड देत आजवर उद्योग चालवले, परंतु प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना किंवा सकारात्मक पावले उचलली जात नसल्याने अखेर आम्हाला नाइिलाजाने दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे."

— धनंजय शेंडबाळे, मालक, दीक्षा एक्स्पोर्ट

"प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांसमोर ही धोरणात्मक पोकळी तयार झाली आहे. चाकण भागातील वीस लघुउद्योगांनी कंपनीला टाळे लावण्याची प्रक्रिया सुरू केली असून, हे सर्व उद्योग खंडाळा एमआयडीसीत स्थलांतरित होत आहेत. आमच्या संघटनेकडे आणखी चाळीस उद्योजकांनी जागेची मागणी केली आहे."

— शंतनू कुलकर्णी, अध्यक्ष, लघुउद्योग संघटना व मालक, मॅट्रिक्स टुलिंग्ज

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 1
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी