Police Activity || पोलिसांचे आदेश धाब्यावर बसवून डीजे वाजवणे भोवले; कुरुळी येथे एकावर गुन्हा दाखल करून डीजे व गाडी पोलिसांकडून जप्त..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
कुरुळी (ता. खेड) : पोलिसांच्या कायदेशीर आदेशांचकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सार्वजनिक ठिकाणी बेधडक डीजे सुरू ठेवल्याप्रकरणी एका तरुणावर दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुधीर तुकाराम दरेकर (वय वर्षे, रा. सुम्ब्रेनगर, वाकी खुर्द, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सुनील धोंडिराम बनकर (वय ४०, नेमणूक - दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास मौजे कुरुळी (ता. खेड) गावच्या हद्दीत सॅनी कंपनीकडून निघोजेकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावरील सॅनी चौकात, ॲक्युरोब क्रॉपटेक कंपनीजवळ ही घटना घडली. आरोपी सुधीर दरेकर याने सक्षम प्राधिकाऱ्यांच्या व पोलिसांच्या कायदेशीर आदेशांचे उल्लंघन करत डीजे सुरूच ठेवला होता.
या प्रकारामुळे ध्वनीप्रदूषण व सार्वजनिक शांततेचा भंग झाल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम २२३, २७०, २९३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३६/१३४, ३७(१)(ई)/१३५(i), ३८(अ)(i)/१३६ अन्वये गुन्हा दाखल करून डीजे व गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक पिंजारी आणि पोलीस उपनिरीक्षक मोगले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करे करत आहेत.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
1
Sad
0
Wow
1