Crime Update || दहशत माजवण्यापूर्वीच डाव फसला; चिंचोशीचा तरुण घातक तलवारीसह जेरबंद..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पेट्रोलिंग करणाऱ्या चाकण उत्तर पोलिसांनी एका १९ वर्षीय तरुणाला धारदार तलवारीसह ताब्यात घेतले आहे. आकाश नवनाथ लोखंडे (वय १९ वर्षे, रा. चिंचोशी) असे या कारवाईत पकडण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्याकडून बेकायदेशीर बाळगलेली घातक तलवार जप्त करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना पथकाला एका संशयित तरुणाबाबत गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता आकाश लोखंडे याच्याकडे धारदार तलवार आढळून आली. पोलिसांनी तात्काळ ती तलवार जप्त करत आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी आकाश लोखंडे विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम (आर्म्स ॲक्ट) कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक
सदर धडक कामगिरी पोलीस उपायुक्त मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रांजणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत आरदवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मोरखांडे, पोलीस अंमलदार शिंदे, कोळेकर, ढमढेरे, लोखंडे, कोळी, जगताप आणि सांडभोर यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0