Crime Update || चाकण उत्तर पोलिसांचा दणका! वाहनांची ‘चाके’ लंपास करणाऱ्या नाशिकच्या चोरांना बेड्या; ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत..!

Sep 20, 2026 - 09:34
 0
Crime Update || चाकण उत्तर पोलिसांचा दणका! वाहनांची ‘चाके’ लंपास करणाऱ्या नाशिकच्या चोरांना बेड्या; ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : रात्रीच्या अंधारात ट्रान्सपोर्टच्या उभ्या वाहनांना टार्गेट करून त्यांची स्पेअर व्हील (स्टेपनी) चोरणाऱ्या टोळीचा चाकण उत्तर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अत्यंत शिताफीने तपास करत पोलिसांनी नाशिक येथून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेली ६० हजार रुपयांची चाके जप्त करण्यात यश मिळवले आहे.

विवेक अशोक गायकवाड (वय ३२ वर्षे, रा. सिडको नगर, नाशिक) आणि राहुल गजानन साळवे (वय २५ वर्षे, रा. रामदास पोलीस चौकीसमोर, सातपूर रोड, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

रात्रीच्या अंधारात वाहनांवर डल्ला..

चाकण गावठाण परिसरातील अगरकर ट्रान्सपोर्टच्या कार्यालयासमोर पार्क केलेल्या व्यावसायिक वाहनांमधून ४ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास लोखंडी रिम व टायर असलेली स्पेअर व्हील अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ट्रान्सपोर्ट हब असलेल्या चाकण परिसरात अशा चोऱ्यांमुळे वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

तांत्रिक तपास आणि नाशिक कनेक्शन..

गुन्ह्याची गंभीरता ओळखून तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी करत तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय खबऱ्यांच्या माध्यमातून धागेदोरे गोळा करण्यास सुरुवात केली. संशयितांचा माग काढत असताना ही टोळी नाशिकची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने नाशिक येथे सापळा रचून विवेक गायकवाड आणि राहुल साळवे या दोघांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी या चोरीची कबुली दिली.

टाटा वाहनांची चाके जप्त..

आरोपींकडून टाटा ७०९ आणि टाटा १२१२ या मॉडेल्सची लोखंडी रिम व टायर असलेली स्पेअर व्हील असा एकूण अंदाजे ₹६०,०००/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपींनी अशा प्रकारे इतर ठिकाणीही चोऱ्या केल्या आहेत का, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

कारवाई करणारे पथक..

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रांजणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम व पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत आरदवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोरखंडे, पोलीस अंमलदार शिंदे, कोळेकर, प्रीतम ढमढेरे, शिवाजी लोखंडे, कोळी, जगझाप व सांडभोर यांच्या पथकाने केली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी