शैक्षणिक || ​"विद्यार्थीदशेत ध्येय, स्वप्ने आणि प्रेमाचा सुंदर समन्वय साधा: डॉ. संजय चाकणे"

Aug 5, 2026 - 09:41
 0
शैक्षणिक || ​"विद्यार्थीदशेत ध्येय, स्वप्ने आणि प्रेमाचा सुंदर समन्वय साधा: डॉ. संजय चाकणे"

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

पुणे (खडकी): विद्यार्थीदशेत केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता ध्येय, स्वप्ने आणि जीवनमूल्यांचा यशस्वी संगम साधणे गरजेचे आहे. जीवनजाणिवेचा भक्कम पाया उभारूनच हळव्या प्रेमात गुंतले पाहिजे, असा मौलिक संदेश खडकी शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी दिला.


खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या (स्वायत्त) मराठी विभागातर्फे आयोजित 'शब्दसृष्टी' साप्ताहिक भित्तीपत्रक आणि 'सृजन' कवी कट्ट्याच्या उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. चराचर सृष्टीतील प्रत्येक घटकावर प्रेम करण्याची संवेदनशीलता प्रत्येकाने जोपासावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

काव्यमय सादरीकरणाने रंगला कार्यक्रम...

उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित 'प्रेमाच्या कवितांचे सादरीकरण' या विशेष सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. निसर्ग, माणुसकी, जीवनमूल्ये आणि प्रेमभावनांवर आधारित कवितांचे विद्यार्थ्यांनी केलेले प्रभावी सादरीकरण उपस्थितांची दाद मिळवून गेले.

सर्जनशीलतेला हक्काचे व्यासपीठ...

यावेळी मनोगत व्यक्त करताना आयक्यूएसी प्रमुख डॉ. गौरी माटेकर यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा मिळत असल्याचे नमूद केले. तर, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. जे. डी. नाईक यांनी कविता ही समाजात संस्कार आणि संवेदनशीलता टिकवून ठेवण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सुचेता दळवी, संगणक विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. राजेंद्र लेले यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र काळे यांनी प्रास्ताविकेतून उपक्रमाची पार्श्वभूमी मांडली, तर प्रा. स्वामीराज भिसे (विद्यार्थी कल्याण विभागप्रमुख) यांनी सूत्रसंचालन केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी