School Scam || खराबवाडीतील 'अँग्लो इंग्लिश स्कूल'चा पालकांच्या खिशाला कात्री आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ.!

शिक्षण विभागाचे नियम धाब्यावर बसवून सोमनाथ थोरात यांची मनमानी; शिक्षण विभागाची मान्यता आहे की नाही? पालकांमध्ये संभ्रमावस्था..

Apr 23, 2026 - 16:30
 0
School Scam || खराबवाडीतील 'अँग्लो इंग्लिश स्कूल'चा पालकांच्या खिशाला कात्री आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ.!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण(खराबवाडी): चाकण परिसरातील खराबवाडी येथील 'अँग्लो इंग्लिश स्कूल' सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शाळेत ना विद्यार्थ्यांसाठी आवश्यक भौतिक सुविधा आहेत, ना पुरेशी शिक्षक संख्या. तरीही शाळा व्यवस्थापक सोमनाथ थोरात सर्व नियम धाब्यावर बसवून शाळा चालवत असून, नवीन शैक्षणिक वर्षाची फी वसुली करण्यासाठी जाहिरातबाजी सुरू केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

शासकीय मान्यता फक्त नावापुरतीच?

या शाळेच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने या शाळेची चौकशी केली होती, परंतु त्या चौकशीचा अहवाल अद्यापही 'गुलदस्त्यात' का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिक्षण विभागाची नेमकी मान्यता या शाळेला आहे की नाही, याबाबत साशंकता असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेण्यापूर्वी सावध राहण्याची गरज आहे.

मुलांच्या जीवाशी खेळ, आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा बोजवारा..

शाळेत पाहणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना नाही. ना स्वच्छ शौचालयाची सोय, ना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही सुविधा. एक प्रकारे ही शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी चाललेला खेळच असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, या शाळेचे स्थलांतरही बेकायदेशीरपणे केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, कायद्याला न जुमानता हा कारभार सुरू आहे.

व्यवस्थापक सोमनाथ थोरात यांच्या मनमानीवर शिक्षण विभाग काय कारवाई करणार?

शाळेचे व्यवस्थापन पाहणारे सोमनाथ थोरात हे कोणत्याही नियमांचे पालन न करता केवळ नफेखोरीसाठी शाळा चालवत असल्याचा आरोप होत आहे. शाळा बेकायदेशीर असल्याची लक्षणे दिसत असतानाही पालकांकडून फी उकळण्यासाठी त्यांनी जाहिरातींचा धडाका लावला आहे. या प्रकरणी पंचायत समिती खेडच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, "या शाळेची सविस्तर माहिती घेण्यात येत असून चौकशी अहवालानुसार कडक कारवाई केली जाईल."

पालकांनो, बोगसगिरीला बळी पडू नका!

एकीकडे प्रशासन चौकशीचा फेरा लावत असताना दुसरीकडे शाळा व्यवस्थापन निर्धास्तपणे फी गोळा करत आहे. त्यामुळे अशा 'बोगस' किंवा सुविधा नसलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेताना पालकांनी शाळेची अधिकृत मान्यता, जागा आणि सुविधांची खातरजमा करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

"शिक्षण विभागाच्या चौकशी अहवालानंतर या शाळेवर काय कारवाई होते, याकडे आता संपूर्ण खराबवाडी परिसराचे लक्ष लागले आहे."

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 2
Angry Angry 0
Sad Sad 1
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी