विशेष बातमी: शिक्षणाचे मातेरं! खराबवाडीतील 'ऍग्लो' शाळेत गुरुजींचा पत्ता नाही, चालक थोरातकडून पालकांची लूट सुरूच!

Mar 12, 2026 - 10:28
 0
विशेष बातमी: शिक्षणाचे मातेरं! खराबवाडीतील 'ऍग्लो' शाळेत गुरुजींचा पत्ता नाही, चालक थोरातकडून पालकांची लूट सुरूच!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

​खराबवाडी (चाकण): विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे स्वप्न दाखवून पालकांकडून लाखो रुपये फी उकळणाऱ्या खराबवाडी येथील 'ऍग्लो इंग्लिश मीडियम' शाळेचा काळा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वार्षिक परीक्षा तोंडावर आली असताना शाळेत विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य आता 'रामभरोसे' झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शाळेचा चालक सोमनाथ थोरात हा केवळ वसुलीत मग्न असून, त्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा मांडला आहे.

📍 फीसाठी सक्ती, पण सुविधा शून्य!

​मिळालेल्या माहितीनुसार, चालक सोमनाथ थोरात हा पालकांकडून सक्तीने फी वसूल करत आहे. मात्र, शाळेत ना शिक्षक आहेत ना योग्य व्यवस्था. शाळेच्या जागेचे भाडे थकले असून शिक्षकांचे मानधनही अनेक महिन्यांपासून देण्यात आलेले नाही. परिणामी, वैतागलेल्या शिक्षकांनी शाळा सोडली असून, वर्गांमध्ये शांतता पसरली आहे.

🏃‍♂️ चालक थोरातचा 'लपंडाव'

​जेव्हा पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत जाब विचारायला शाळेत जातात, तेव्हा हा बहाद्दर सोमनाथ थोरात तोंड लपवून पळ काढतो. पालकांच्या अडचणी सोडवण्याऐवजी, त्यांच्याकडून मिळालेल्या पैशातून स्वतःची मौजमजा करण्यात हा चालक मग्न असल्याचा खळबळजनक आरोप पालकांकडून केला जात आहे.

​🚩 प्रमुख मुख्य मुद्दे:

​शिक्षकांचा अभाव: मानधन थकवल्यामुळे शिक्षक शाळेत फिरकेनासे झाले आहेत.

​परीक्षेचे संकट: काही दिवसांवर वार्षिक परीक्षा असताना मुलांचा अभ्यासक्रम अपूर्ण आहे.

​आर्थिक गैरव्यवहार: जागेचे भाडे आणि पगार थकवून थोरात पालकांच्या पैशावर डल्ला मारत असल्याचा संशय.

​पालकांमध्ये संताप: वारंवार संपर्क करूनही थोरात समोर येण्यास तयार नाही.

⚖️ प्रशासनाकडे कारवाईची मागणी

​अशा 'बांडगुळ' प्रवृत्तीच्या शाळा चालकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. खेड पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन या बेभान शाळेवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. जर वेळीच पावले उचलली नाहीत, तर विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगण्यास हे डोळेझाक करणारे प्रशासन आणि थोरातचं जबाबदार असेल.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 2
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी