‘अँग्लो इंग्लिश मिडीयम’ची शाळा की लूटमारीचा अड्डा? मुलांच्या भवितव्याची राखरांगोळी करणाऱ्या व्यवस्थापनाला खेड शिक्षण विभागाचे 'मौनी' संरक्षण?

खराबवाडीतील बोगस शाळा आणि शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; कारवाई कधी?

Jun 4, 2026 - 09:10
 0
‘अँग्लो इंग्लिश मिडीयम’ची शाळा की लूटमारीचा अड्डा? मुलांच्या भवितव्याची राखरांगोळी करणाऱ्या व्यवस्थापनाला खेड शिक्षण विभागाचे 'मौनी' संरक्षण?

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

खेड(पुणे) : खराबवाडी येथील 'अँग्लो इंग्लिश मिडीयम' शाळा शिक्षणदानाचे पवित्र कार्य करत नसून पालकांच्या खिशाला कात्री लावणारा एक 'लूटमारीचा अड्डा' बनली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न दाखवून अक्षरशः 'खंडणीखोर' पद्धतीने पालकांची आर्थिक लूट करणाऱ्या या बोगस शाळेला खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे 'डोळेझाकू' धोरण चांगलेच फावले आहे. या शाळेच्या बेकायदेशीर कारभारावर गट शिक्षण अधिकारी साहेबांची संशयास्पद 'मौनव्रताची' भूमिका आता चर्चेचा आणि संतापाचा विषय बनली आहे.

शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने बोगसगिरीचा 'कल्ला'..

शाळेचे संस्थापक आणि व्यवस्थापक केवळ गोड बोलून पालकांना फसवण्यात माहीर आहेत. शाळेच्या नावाखाली जमा झालेला लाखो रुपयांचा निधी कुठे खर्च होतो? शिक्षकांचे पगार का थकवले जातात? शाळेच्या जागेचे भाडे का दिले जात नाही? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असतानाही, खेड पंचायत समितीचा शिक्षण विभाग मात्र 'जैसे थे' परिस्थितीत आहे. वारंवार तक्रारी करूनही गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून केवळ "नोटीस काढतो", "बघतो" अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. यावरून 'डाल में कुछ काला नहीं, बल्कि पूरी दाल ही काली है', असा संशय व्यक्त होत आहे.

भावी पिढीच्या आयुष्याशी 'धोकादायक खेळ'..

शाळेत ना उच्चशिक्षित शिक्षक आहेत, ना शासनाचे नियम पाळले जातात. अशी शाळा चालवणे म्हणजे थेट विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बळी देणे आहे. तरीही शिक्षण विभाग इतका निगरगट्ट का झाला आहे? त्यांना नक्की कशाची भीती वाटतेय किंवा कशाचे दडपण आहे? हे प्रश्न आता सर्वसामान्य पालकांच्या मनात घर करून आहेत. तालुक्यात अशा अनेक शाळांकडे शिक्षण विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने, 'सुशिक्षित भारत' घडवण्याचे स्वप्न फक्त दिवास्वप्नच राहील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गटशिक्षण अधिकारी साहेब, जाग यायला अजून किती 'वेळ' लागणार?

शिक्षण विभाग जर अशा बोगस शाळेला पाठिशी घालत असेल, तर 'सुशिक्षित भारत' आणि 'भविष्यातील उज्ज्वल पिढी' ही केवळ कागदी स्वप्ने उरतील. आपली निष्क्रियता भविष्यातील पिढीला बरबाद होण्यास कारणीभूत ठरेल. आजही वेळ गेलेली नाही, आपल्या डोळ्यांवरची 'भ्रमाची' पट्टी काढा आणि या 'खंडणीखोर' शाळांवर कारवाईचा बडगा उगारा. अन्यथा, येणाऱ्या पिढीच्या शापाचे धनी आपण व्हाल एवढे मात्र नक्की.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 1
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी