Political Activity || बिरदवडीचे मा.आदर्श सरपंच बाबासाहेब पवार यांची चाकण विविध कार्यकारी सोसायटीच्या 'तज्ञ संचालक' पदी निवड!

Aug 10, 2026 - 21:44
 0
Political Activity || बिरदवडीचे मा.आदर्श सरपंच बाबासाहेब पवार यांची चाकण विविध कार्यकारी सोसायटीच्या 'तज्ञ संचालक' पदी निवड!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : खेड तालुक्यातील राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बिरदवडी गावचे माजी आदर्श सरपंच श्री. बाबासाहेब पवार यांची चाकण विविध कार्यकारी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी अत्यंत (प्रभावी) आणि मानाच्या पदावर एकमुखी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सहकार आणि राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


दीर्घकाळ राजकीय व सामाजिक सेवा...

​ बाबासाहेब पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय व सामाजिक जीवनात तब्बल २५ वर्षे बिरदवडी गावच्या ग्रामपंचायतचे सदस्य, आदर्श सरपंच आणि उपसरपंच अशी विविध महत्त्वाची पदे अत्यंत यशस्वीपणे भूषविली आहेत. याशिवाय, त्यांनी खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सेवा दलाचे अध्यक्षपदही अत्यंत निष्ठापूर्वक आणि यशस्वीपणे पार पाडले आहे.

निर्णायक राजकीय वजन आणि सहकाराला फायदा..

खेड तालुक्याच्या राजकारणात बाबासाहेब पवार यांचे प्रस्थ आणि वजन पाहता, त्यांची प्रत्येक भूमीका तालुक्याच्या राजकारणात अत्यंत निर्णायक ठरते. तळागाळातील लोकांच्या प्रश्नांची जाण आणि प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अशा अनुभवी आणि खमक्या नेतृत्वाची चाकणसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या सहकारी सोसायटीच्या 'तज्ञ संचालक' पदी निवड झाल्यामुळे, त्यांच्या या समृद्ध राजकीय व सहकार क्षेत्रातील अनुभवाचा संस्थेच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी नक्कीच मोठा फायदा होईल, असा विश्वास सहकार क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.


सध्या त्यांच्या या गौरवास्पद निवडीबद्दल विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी