Hooliganism || निघोजेत सरपंच पतीची दादागिरी! सोसायटीच्या सभेत हिशोब विचारणाऱ्या वकिलाला मारहाण; सरपंच पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल..!

Sep 15, 2026 - 21:50
 0
Hooliganism || निघोजेत सरपंच पतीची दादागिरी! सोसायटीच्या सभेत हिशोब विचारणाऱ्या वकिलाला मारहाण; सरपंच पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

निघोजे(ता. खेड) : सोसायटीच्या कामांचा आणि पैशांचा हिशोब विचारल्याच्या रागातून निघोजेच्या विद्यमान सरपंचांचे पती कैलास येळवंडे यांची अरेरावी आणि गुंडगिरी समोर आली आहे. निघोजे येथील ‘कॅपिटल सिटी’ को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) हाऊसकीपिंगच्या थकीत बिलाचा तपशील मागणाऱ्या वकिलावर धावून जात सरपंच पती आणि त्यांच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी सरपंच पती कैलास येळवंडे, त्यांची सरपंच पत्नी यांच्यासह पाच जणांविरुद्ध दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


व्यासपीठावरून अरेरावी; जाब विचारताच थेट वकिलावर हल्ला..

​६ सप्टेंबर रोजी कॅपिटल सिटी सोसायटीच्या क्लब हाऊससमोरील मोकळ्या जागेत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे अध्यक्षस्थान सरपंच पती कैलास हिरामण येळवंडे भूषवत होते. दुपारच्या सत्रात सोसायटीचे रहिवासी ॲड. बभिषण रामदास पडवळ (वय ३५) यांनी हाऊसकीपिंगच्या थकीत बिलांचा हिशोब व तपशील मागितला.


सोसायटी सदस्याने लोकशाही मार्गाने हिशोब विचारताच सरपंच पती कैलास येळवंडे यांचा पारा चढला. त्यांनी थेट व्यासपीठावरून आक्रमक होत सदस्यांना धमकावण्यास व आक्षेपार्ह भाषा वापरण्यास सुरुवात केली. समोर आलेल्या व्हिडिओंमध्येही कैलास येळवंडे हे टेबलावरून संतापाने उठून सदस्यांवर ओरडताना आणि थेट अंगावर धावून जाताना स्पष्ट दिसत आहेत.

महिला वकिलाशीही लज्जास्पद वर्तन...

​वाद वाढत गेल्यानंतर सरपंच पती कैलास येळवंडे, शुभम येळवंडे आणि तुषार येळवंडे यांनी मिळून ॲड. पडवळ यांच्यावर तुटून पडत त्यांच्या डोक्यात, पाठीत, छातीत आणि पायांवर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी महिला सरपंच व त्यांची सहकारी महिला यांनीही फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या फिर्यादीच्या पत्नीशीही आरोपींनी लज्जास्पद व अश्लील भाषेत बोलून तिचा अपमान केला.


पाच जणांवर गुन्हा दाखल...

​ॲड. बभिषण पडवळ यांच्या फिर्यादीवरून दक्षिण महाळुंगे पोलिसांनी खालील आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा रजि. नं. ७३५/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे:

• कैलास हिरामण येळवंडे (वय ४२, सरपंच पती)

• ​शुभम विजय येळवंडे (वय २५)

• ​तुषार तानाजी येळवंडे (वय ३८) यांच्यासह दोन महिला 

राजकीय पदाचा आणि सत्तेचा गैरवापर करत गृहनिर्माण सोसायटीमध्ये अशा प्रकारे दहशत माजवून कायदा हातात घेणाऱ्या सरपंच पतीच्या या कृत्यामुळे निघोजे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 5
Dislike Dislike 2
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 1
Sad Sad 0
Wow Wow 1
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी