"अश्विनी भोसले: संघर्षातून यशाच्या शिखरापर्यंत... खराबवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा!"
संघर्ष काय असतो तो अश्विनी भोसलेने यश संपादक करून दाखवून दिला..
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण (प्रतिनिधी): जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही आकाशाला गवसणी घालू शकतात, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. खेड तालुक्यातील खराबवाडी येथील कु. अश्विनी विनायक भोसले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण खेड तालुक्यात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अश्विनी यांनी हे यश संपादन केले आहे. सातत्यपूर्ण परिश्रम, अभ्यासातील चिकाटी आणि ध्येय गाठण्याची जिद्द यांच्या जोरावर त्यांनी हे मानाचे पद मिळवले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्या आता एक आदर्श आणि प्रेरणास्थान ठरल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे परिसरातील अनेक तरुणांना स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची नवी उमेद मिळणार आहे.
आपल्या यशाचे श्रेय अश्विनी यांनी कुटुंबियांचे प्रोत्साहन, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि स्वतःच्या अथक मेहनतीला दिले आहे. त्यांच्या या निवडीमुळे खराबवाडी गावात ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.
भविष्यात पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करून समाजसेवेत आपले मोलाचे योगदान देतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला असून त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
2