Crime Story || ​'साहीलच्या चॅटिंग अन् ब्लॉक नंबरने बळी घेतला; प्रेमभंगामुळे २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या'..!

Jul 19, 2026 - 18:21
 0
Crime Story || ​'साहीलच्या चॅटिंग अन् ब्लॉक नंबरने बळी घेतला; प्रेमभंगामुळे २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या'..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

महाळुंगे इंगळे(चाकण) :: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एका अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराच्या संशयास्पद वर्तणुकीमुळे आणि मानसिक त्रासामुळे २२ वर्षीय तरुणीने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या प्रकरणी प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

मयत तरुणीचे नाव मोनिका रामदास पवार (वय २२) असे असून, ती तुळवे वस्ती, खालुंब्रे गाव (ता. खेड) येथे राहत होती. फिर्यादी आणि मयत तरुणीची आई रोहिणी रामदास पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मोनिकाचे साहील शंकर बोत्रे (वय २४, रा. येलवाडी) याच्यासोबत गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. साहील आणि मोनिका लग्न करणार होते, मात्र साहीलचे इतर तरुणींशी चॅटिंग सुरू असल्याचे मोनिकाच्या लक्षात आले.

असा दिला त्रास...

जेव्हा मोनिकाने साहीलला या चॅटिंगबद्दल जाब विचारला, तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. इतकेच नाही तर, साहीलने मोनिकाचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. एवढ्यावरच न थांबता साहीलने आपल्या आईच्या मोबाईलवरूनही मोनिकाचा नंबर ब्लॉक करून तिला संपर्क करण्यापासून रोखले. यामुळे मोनिका प्रचंड तणावाखाली होती. "साहीलने माझे आयुष्य बरबाद केले आहे, मला खूप अस्वस्थ वाटत आहे," असे आपल्या मैत्रिणीला सांगत १५ जुलै रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत मोनिकाने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलीस कारवाई..

या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये साहील शंकर बोत्रे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन महाडिक हे करत आहेत, तर गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेत पोलीस उपनिरीक्षक अनिस मुल्ला यांनी काम पाहिले आहे.

​प्रियकराच्या या कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 1
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी