मोठी बातमी : चाकणमध्ये गॅस तुटवड्यामुळे संतापाचा उद्रेक; नागरिकांकडून पुणे-नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न...!

Mar 21, 2026 - 10:03
 0
मोठी बातमी : चाकणमध्ये गॅस तुटवड्यामुळे संतापाचा उद्रेक; नागरिकांकडून पुणे-नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न...!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

​चाकण: इराण आणि इस्राईल दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत. या आंतरराष्ट्रीय तणावामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, चाकण परिसरात घरगुती गॅसचा मोठा तुटवडा जाणवत आहे. तासनतास रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नसल्याने अखेर संतप्त नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन केले.

गॅस एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा..

​चाकण परिसरातील भारत गॅस एजन्सीबाहेर गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पहाटेपासून नागरिक रांगेत उभे राहत आहेत, मात्र दिवस संपला तरी रिकाम्या हाताने घरी जावे लागत आहे. गॅस वितरणातील या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य गृहिणी आणि नागरिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे.


महामार्ग रोखल्याने पोलिसांची उडाली धांदल..

​गॅस मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या नागरिकांनी थेट पुणे-नाशिक महामार्गावर धाव घेत रस्ता अडवून धरला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. विशेष म्हणजे, चाकण वाहतूक विभाग आणि दक्षिण पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असतानाही हे आंदोलन झाल्याने पोलिसांची मोठी धांदल उडाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

प्रशासनाचा दावा फोल?

​एकीकडे खेड पुरवठा प्रशासन तालुक्यात गॅसचा साठा मुबलक असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्षात नागरिकांना एका सिलेंडरसाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासनाचा हा दावा आणि जमिनीवरील वस्तुस्थिती यात मोठी तफावत असल्याचे चित्र दिसत आहे.

"आम्ही कामाधंद्यावर जायचे सोडून गॅससाठी रांगेत उभे आहोत, तरीही गॅस मिळत नाही. प्रशासनाने फक्त आश्वासने न देता प्रत्यक्ष पुरवठा सुरळीत करावा," अशी भावना एका आंदोलक नागरिकाने व्यक्त केली.

-एक आंदोलक 

​गॅस वितरणाचा हा प्रश्न जर येत्या काही दिवसांत मार्गी लागला नाही, तर यापेक्षाही तीव्र आणि भयावह आंदोलन छेडले जाईल, असा इशारा चाकण परिसरातील नागरिकांनी दिला आहे. सध्या महामार्गावरील तणाव निवळला असला तरी गॅसचा प्रश्न अद्याप कायम आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी