अड्याळची ग्रामसभा ठरणार ‘हायव्होल्टेज’! २५ ऑगस्टला गुजरी चौकात ग्रामस्थांची गर्दी..!

Aug 21, 2026 - 16:46
 0
अड्याळची ग्रामसभा ठरणार ‘हायव्होल्टेज’! २५ ऑगस्टला गुजरी चौकात ग्रामस्थांची गर्दी..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी नितीन वरवंटीवार

भंडारा :: भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथे २५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार ही ग्रामसभा गुजरी चौकात घेण्याचे निश्चित करण्यात आले असून, या सभेबाबत संपूर्ण परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.


ग्रामसभा गुजरी चौकातच पार पडावी, यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. ही मागणी मान्य झाल्याने आता या सभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या सोशल मीडियावरही या ग्रामसभेच्या संदर्भातील चर्चेला उधाण आले आहे.

प्रशासनाच्या उत्तरांकडे सर्वांचे लक्ष..

या ग्रामसभेत नेमके कोणते स्थानिक प्रश्न उपस्थित होणार, ग्रामस्थांना त्यांच्या समस्यांवर मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळणार का आणि उपस्थित मुद्द्यांवर प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे दिली जाणार का, याकडे संपूर्ण अड्याळकरांचे लक्ष लागले आहे.

​‘प्रश्न ग्रामस्थांचे, उत्तरदायित्व प्रशासनाचे’ या भूमिकेतून होणारी ही ग्रामसभा शांततेत पार पडते की विविध प्रश्नांवरून प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार खडाजंगी रंगते, हे आता २५ ऑगस्ट रोजी गुजरी चौकातच स्पष्ट होईल.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी