अल्पवयीन मुलीवर अत्याचार! पीडित ४ ते ५ महिन्यांची गर्भवती - नराधम तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल...
प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार, भंडारा
भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नराधमाने लग्नाचे आमिष दाखवून किंवा अन्य कारणाने अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याने ती ४ ते ५ महिन्यांची गर्भवती राहिली आहे. या प्रकरणी अड्याळ पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सुञानुसार, पीडित मुलगी ही १७ वर्ष ६ महिने वयाची असून, ती अल्पवयीन आहे. आरोपी रोहित नगरे (वय २०, रा. अड्याळ) याला पीडिता अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणीव होती. असे असतानाही त्याने पीडितेला आपल्या घरी बोलावून तिच्यावर १ नोव्हेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपीने पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या नराधमाच्या कृत्यामुळे पीडित मुलगी ४ ते ५ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून अड्याळ पोलिसांनी आरोपी रोहित नगरे याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६४(२)(एम) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक पोक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास अड्याळ पोलीस करत आहेत.या घटनेमुळे संपूर्ण अड्याळ परिसरात संतापाची लाट पसरली असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0