ACB ​Action || ‘लाचखोर’ एपीआय गळाला; १० लाखांची मागणी अन् ५ लाखांवर तडजोड!

Jul 14, 2026 - 14:32
 0
ACB ​Action || ‘लाचखोर’ एपीआय गळाला; १० लाखांची मागणी अन् ५ लाखांवर तडजोड!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : तक्रार अर्जाची चौकशी निकाली काढण्याच्या मोबदल्यात ५ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) तानाजी शिवाजी कदम यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?

तक्रारदार हे पुण्यात जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारदार आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात चाकण उत्तर पोलीस स्टेशनमध्ये दोन तक्रार अर्ज आले होते. हे दोन्ही अर्ज तानाजी कदम यांच्याकडे चौकशीसाठी होते. हे अर्ज 'दिवाणी स्वरूपाचे' आहेत असे दाखवून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून निकाली काढण्यासाठी कदम यांनी सुरुवातीला १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

एसीबीच्या पडताळणीत सत्य आले बाहेर..

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), पुणे यांच्याकडे धाव घेतली. एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता, तानाजी कदम यांनी तडजोडीअंती ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ही लाच दोन टप्प्यांत घेण्याचे ठरले होते—पहिले अडीच लाख रुपये आणि तक्रार अर्ज निकाली काढल्यानंतर उर्वरित अडीच लाख रुपये.

लाच मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतर, आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीनुसार निगडी पोलीस स्टेशनमध्ये तानाजी कदम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 1
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी