क्राईम :: दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट -३ ची धडाकेबाज कामगिरी! वाहन चोरीचा गुन्हा उघड; ७० हजारांची मोटारसायकल जप्त..!

Jul 26, 2026 - 21:32
Jul 26, 2026 - 21:38
 0
क्राईम :: दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट -३ ची धडाकेबाज कामगिरी! वाहन चोरीचा गुन्हा उघड; ७० हजारांची मोटारसायकल जप्त..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

दिघी (पुणे):: दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने एका रेकॉर्डवरील चोरट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. जालना जिल्ह्यातून आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल हस्तगत केली असून, या कारवाईमुळे दिघी पोलिसांकडील वाहन चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे.

पोलीस आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) नुसार वाहन चोरीचा गुन्हा दाखल (गु.र.नं. ३१८/२०२६) करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट ३ कडील अधिकारी व अंमलदार करत होते. तपास सुरू असताना पोलीस शिपाई शशिकांत नांगरे यांना खबऱ्यामार्फत एक महत्त्वाची गोपनीय बातमी मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मूळ जालना जिल्ह्यातील असलेल्या आरोपीस ताब्यात घेतले.

तपास, कारवाई आणि आरोपीची..

सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोहवा ऋषिकेश भोसुरे, पोहवा श्रीधन इचके व पोशि शशिकांत नांगरे यांच्या पथकाने यशस्वी पार पाडली..

या कारवाईत आरोपी अजय जनार्दन राठोड (वय २३ वर्षे) ​सध्या रा. साईनाथ इंगळे यांच्या खोलीत भाड्याने, फुगेवस्ती, दिघी, ता. हवेली, जि. पुणे. मूळ रा.दहिफळ खंदारे, ता. मंठा, जि. जालना. येथील रहिवाशी असून त्यास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे कसून चौकशी केली असता, त्याने वाहन चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली व चोरीस गेलेली होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल (आरटीओ क्रमांक: MH 24 CA 9355, किंमत अंदाजे ७०,०००/- रुपये) असे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

​या धडाकेबाज कारवाईमुळे दिघी पोलिसांच्या हद्दीतील वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास दिघी पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी