Political Drama || खेड बाजार समितीत सत्तेचा नवा अध्याय! अशोक राक्षे ‘सभापती’ तर रणजित गाडे ‘उपसभापती’ पदी फिक्स; आमदारांच्या घोषणनेने राजकीय चर्चांना उधाण!

Jul 28, 2026 - 09:41
 0
Political Drama || खेड बाजार समितीत सत्तेचा नवा अध्याय! अशोक राक्षे ‘सभापती’ तर रणजित गाडे ‘उपसभापती’ पदी फिक्स; आमदारांच्या घोषणनेने राजकीय चर्चांना उधाण!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

खेड(राजगुरूनगर) :: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या आगामी बदलाबाबतची राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. आमदार बाबाजी काळे आणि विद्यमान सभापती विजय शिंदे पाटील यांनी पत्रकार बैठकीत आगामी पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली असून, त्यानुसार सभापतीपदी अशोक राक्षे तर उपसभापती पदी रणजित गाडे यांची निवड निश्चित मानली जात आहे.

यावेळी बोलताना आमदार बाबाजी काळे म्हणाले की, २० महिन्यांपूर्वी बाजार समितीत सर्वपक्षीय मंडळींनी एकत्र येऊन मोठा बदल घडवला आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून बाजार समितीत उल्लेखनीय विकास व कायापालट करण्यात आला. आमच्या तीन संचालकांच्या विरोधात विरोधकांनी अपील दाखल केले असले, तरी तालुक्यातील काही व्यक्ती जुना स्वभाव सोडत नसून सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्हाला कुठल्याही प्रकारचे गटातटाचे राजकारण करायचे नसून आम्ही केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र आलो आहोत, पदासाठी नाही. कोअर कमिटीने ठरवून दिलेल्या सूत्रानुसार आणि सर्वानुमते अशोक राक्षे यांच्याकडे सभापतीपद तर रणजित गाडे यांच्याकडे उपसभापतीपद सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरेशभाऊ गोरे यांच्या माध्यमातून तालुक्यात सुरू झालेला हा सर्वपक्षीय पॅनलचा प्रवाह यापुढेही असाच सुरू ठेवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वसमावेशक राजकारण पुढे नेणार - विजय शिंदे पाटील

विद्यमान सभापती विजय शिंदे पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सर्वपक्षीय नेत्यांच्या पुढाकारानेच बाबाजी काळे आमदार झाले असून, आगामी काळात खेड तालुक्यात सर्वसमावेशक राजकारण कायम ठेवायचे आहे. आज जे आमच्यासोबत नाहीत, तेदेखील भविष्यात आमच्यासोबत येतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी राजकीय वर्तुळात एक नवीन चर्चा सुरू केली. तसेच, आपण पदावर असताना आपल्याला अनेक कायदेशीर लढाई आणि कोर्ट-कचेऱ्यांचा सामना करावा लागल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रामाणिकपणे काम करणार - रणजित गाडे

उपसभापतीपदाचे भावी उमेदवार रणजित गाडे म्हणाले की, आत्ताच्या पदाधिकाऱ्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्यानेच आम्हाला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. ठरलेल्या वेळेत आम्हीदेखील पदाचा राजीनामा देऊ, आणि शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधीत्व करत अत्यंत प्रामाणिकपणे व पारदर्शक कारभार चालवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, नवनिर्वाचित सभापतीपदाचे दावेदार अशोक राक्षे यांनी 'सत्यमेव जयते' असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.

​या महत्त्वपूर्ण बैठकीला व सभापती व उपसभापती पदाच्या घोषणेवेळी आमदार बाबाजी काळे, सभापती विजय शिंदे पाटील, उपसभापती क्रांती सोमवंशी, संजय घनवट, विठ्ठल वनघरे, अशोक राक्षे, माणिक गोरे, रणजित गाडे, जयसिंग भोगाडे, सुधीर मुंगसे, सागर मुऱ्हे, सोमनाथ मुंगसे, सयाजी मोहिते पाटील, संदीप सोमवंशी, अनुराग जैद, महेंद्र गोरे, सुधीर भोमाळे, केशव अरगडे, संतोष गोरडे यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 1
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी