BIG BREAKING || मोई गावात टोळीचा धुमाकूळ: गाडीची तोडफोड करत पिस्तुलातून गोळीबार; दक्षिण व उत्तर महाळुंगे पोलिसांची धडाकेबाज कारवाई..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वादातून काही आरोपींनी मध्यरात्री मोई गावात (ता. खेड) मोठा राडा घालत दहशत माजवली. आरोपींनी फिर्यादीच्या घराजवळ उभ्या असलेल्या दोन महागड्या गाड्यांची दगडफेक करून तोडफोड केली, इतकेच नाही तर पिस्तुलातून गोळीबार करत फिर्यादीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या गंभीर घटनेनंतर दक्षिण महाळुंगे आणि उत्तर महाळुंगे पोलीस स्टेशनच्या पथकांनी संयुक्तिक कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नेमकी घटना आणि गुन्ह्याची कलमे..
दि. २६/०६/२०२६ रोजी रात्री १:०० च्या सुमारास मोई येथील मुक्ताई मंदिरालगत फिर्यादी सुरेश विष्णू गवारी यांच्या घरावर आशिष नंदू गवारी आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला. आरोपींनी फिर्यादीच्या महिंद्रा एक्सयुव्ही ७०० आणि क्रेटा कारची दगडफेक करून तोडफोड केली आणि पिस्तुलाने गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला असून, त्यात खालील कलमांचा समावेश आहे:
• भारतीय न्याय संहिता २०२३: कलम १०९, ३२४(५), १८९(४), १९०, १९१(३), ३(५).
• इतर कायदे: शस्त्र अधिनियम कायदा कलम ३(२५)(२७), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ३ व ७, तसेच मपोका कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अधिकारी यांनी दिली घटनास्थळी भेट..
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-४) श्रीमती श्वेता खेडकर, महाळुंगे विभागाचे सपोआ सचिन कदम आणि गुन्हे-२ चे सपोआ प्रवीण मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
1
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1