BIG UPDATE || ​"पहाटेची धडक! चाकणमध्ये ५७ लाखांच्या गांजासह दोन तस्कर गजाआड; पिंपरी चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई"

Jun 19, 2026 - 09:06
 0
BIG UPDATE || ​"पहाटेची धडक! चाकणमध्ये ५७ लाखांच्या गांजासह दोन तस्कर गजाआड; पिंपरी चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई"

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत चाकण परिसरातून ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत ५७ लाख ७३ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे.

नेमकी घटना:

गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार निखिल वर्षे आणि विजय दौंडकर यांना मिळालेल्या माहितीवरून १८ जून २०२६ रोजी पहाटे ४ वाजता चाकणमधील खंडोबा माळ येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी अनिकेत राजेंद्र बिरंगळ आणि कुशल उध्दव पाठक या दोन आरोपींना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ४१ लाख ९८ हजार रुपये किमतीचा गांजा, १५ लाख रुपयांची स्कॉर्पिओ गाडी, ३ मोबाईल आणि ५१० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.

सदर आरोपींविरुद्ध चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दगडे करत आहेत. 

कारवाई करणारे विशेष पथक:

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष कारवाई करण्यात आली. या मोहिमेत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सपोनि विक्रम गायकवाड, पोउपनि रोहित दिवटे, पोउपनि जिलाणी मोमीन, तसेच अंमलदार जावेद बागसिराज, ज्ञानेश्वर मुळे, किशोर परदेशी, निखिल शेटे, विजय दौंडकर, सदानंद रूद्राक्षे, निखिल वर्षे आणि कपिलेश इगवे यांनी सहभाग घेतला होता. याशिवाय, तांत्रिक विश्लेषणासाठी पोशि सुभाष गुरव आणि पोहवा प्रकाश ननावरे यांनी महत्त्वपूर्ण मदत केली.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी