मोठी बातमी : ​'माझं कुणी वाकडं करू शकत नाही' म्हणणाऱ्या मुजोर प्रमोद ढमढेरेवर गुन्हा दाखल; सोसायटीत दहशत पसरवणाऱ्यावर आता होणार कायदेशीर कारवाई?

मुजोर ढमढेरेवर पोलीस काय कारवाई करणार?

Jun 16, 2026 - 23:50
 0
मोठी बातमी : ​'माझं कुणी वाकडं करू शकत नाही' म्हणणाऱ्या मुजोर प्रमोद ढमढेरेवर गुन्हा दाखल; सोसायटीत दहशत पसरवणाऱ्यावर आता होणार कायदेशीर कारवाई?

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नियमांचे पालन करण्याऐवजी स्वतःची मुजोरी दाखवणाऱ्या प्रमोद अर्जुन ढमढेरे याच्यावर अखेर दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'माझं कुणी वाकडं करू शकत नाही' अशा अविर्भावात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना वारंवार दमदाटी करणाऱ्या ढमढेरेच्या या कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

ऑडिओ रेकॉर्डिंगमधून मुजोरीचे दर्शन..

या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे, प्रमोद ढमढेरे आणि सोसायटीचे प्रामाणिक सचिव यांच्यातील संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग 'लोकन्याय मराठी'च्या हाती लागले आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ढमढेरे अत्यंत असभ्य आणि खालच्या भाषेत सचिवांशी बोलत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येत आहे. यावरून ढमढेरेची प्रवृत्ती आणि त्याची दहशत निर्माण करण्याची पद्धत चव्हाट्यावर आली आहे.

नेमके प्रकरण काय?

'सारा सिटी फेज डी सहकारी गृहनिर्माण संस्थे'च्या प्रशासकीय कामकाजासाठी केवळ एका सदस्याचा मोबाईल क्रमांक अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाचा राग मनात धरून प्रमोद ढमढेरे याने सोसायटीचे सचिव यांना फोन करून, "ग्रुपवर पुन्हा ॲड केले नाही तर परिणाम वाईट होतील," अशी धमकी दिली.

ढमढेरेची मुजोरीची मालिका सुरूच...

प्रमोद ढमढेरे याच्याकडून सोसायटीतील सदस्यांना आणि कमिटीच्या सदस्यांना लक्ष्य करण्याचे प्रकार नवीन नाहीत. यापूर्वीही त्याने अनेकदा व्हॉट्सॲप ग्रुपवर वाद घालून आणि गैरवर्तन करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे. सोसायटीचा व्हॉट्सॲप ग्रुप हा केवळ माहिती आणि सूचना देण्यासाठी असूनही, नियमांना धाब्यावर बसवून ढमढेरेने आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

पोलीस कारवाईकडे सर्वांचे लक्ष..

सोसायटीचे सचिव यांनी याप्रकरणी दिलेल्या तक्रार अर्जानुसार, ढमढेरेच्या या वर्तनामुळे पदाधिकाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आता या मगरूर ढमढेरेवर पोलीस नेमकी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा मुजोर प्रवृत्तींना वेळीच चाप न लावल्यास भविष्यात मोठे संकट ओढवू शकते, अशी चर्चा आता सोसायटीतील रहिवाशांमध्ये रंगली आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 1
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी